आशीष शेलारांना धमकी देणारा सापडला

आशीष शेलारांना धमकी देणारा सापडला

भाजपचे आमदार आशीष शेलार यांना फोनवर धमकी देणाऱ्या एकाला गुन्हे शाखा वांद्रे युनिट ९ च्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या व्यक्तीचे नाव ओसामा समशेर खान (४८) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ओसामा हा माहीम कॉजवे या ठिकाणी राहणारा असून त्याचा आशीष शेलार यांच्यासोबत वाद असल्याचे समजते. वांद्रे युनिट ९ ने त्याला अटक करून वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आशीष शेलार यांना मागील काही दिवसांपासून दोन मोबाईल क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती.  धमकी देणाऱ्याने पूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. आशीष शेलार यांनी पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री यांना लेखी तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आशिष शेलार यांनी यासंबंधीची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली होती. ही धमकी दोन वेगवेगळ्या फोनवरून देण्यात आली होती आणि यासंदर्भात आशिष शेलार यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली. दोन्ही मोबाईल नंबरची माहिती मुंबई पोलिसांना देऊन याबाबत तपास करण्याची त्यांनी विनंती केली होती. तसेच या संदर्भात शनिवार ८ डिसेंबर रोजी ते गृहमंत्र्यांनाही पत्र लिहिणार होते.

हे ही वाचा:

लिओनार्डो डीकॅप्रिओ सदाहरित राहणार…काय आहे हे प्रकरण?

पाकिस्तानच्या सलीम मलिकची ती ऑफर ऐकून शेन वॉर्न हबकला!

पाकिस्तानला गेलेले ते ३ कॉल कोणाचे?

बीएमडब्ल्यूचा रंग माझा वेगवेगळा!

 

आमदार आशिष शेलार यांना २०२० सालीही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तेव्हा त्यांना नऊ वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकी देण्यात आली होती. मात्र, धमकी देणारी व्यक्ती एकच होती, असे तपासातून समोर आले होते. या प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी ठाण्यातील मुंब्रा येथील दोघांना ताब्यात घेतले होते.

Exit mobile version