सिनियर अकाऊंटंटकडून ज्युनियर महिलेचे लैगिंक शोषण

सिनियर अकाऊंटंटकडून ज्युनियर महिलेचे लैगिंक शोषण

परळच्या आंतरराष्ट्रीय शाळेतील घटना

परळ येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेत सिनियर अकाउंटट असलेल्या एका कर्मचाऱ्याने जुनियर अकाउंटटचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी शाळेने केलेल्या कारवाईनंतर त्याने शाळेला अडचणीत आणण्याची धमकी देत २० लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी या सिनियर अकाउंटटविरुद्ध दोन वेगवगेळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निलेश विलास चवाथे (५०) असे या सिनियर अकाउंटटचे नाव आहे. निलेश चवाथे हा पर्ल येथील एका इंटरनॅशनल स्कुलमध्ये सिनियर अकाउंटट या पदावर नोकरी होता. त्याच स्कुलमध्ये ३० वर्षाची महिला जुनियर अकाउंटट म्हणून नोकरी करते. निलेश चवाथे हा नेहमी तिच्यासोबत अश्लील वर्तन करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील बोलत होता.

हे ही वाचा:

नक्षलवाद्यांनी जाहीर केली आरक्षणावरील भूमिका, वाचा सविस्तर…

इटलीची चिंता मिटली

भाजपा खासदारावर हल्ला, तृणमूल काँग्रेसवर आरोप

महाराष्ट्रातील हे जिल्हे चिंताजनक…

गेल्या काही महिन्यांपासून ही महिला त्रास सहन करीत होती. मात्र त्याने नंतर हद्द पार केली. ही महिला गर्भवती असताना तिच्या पोटाला हात लावला म्हणून घाबरलेल्या या महिलेने शाळा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. अखेर शाळेने चौकशी समिती नेमली. या चौकशीत निलेश चवाथे हा दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाची कारवाई केल्यामुळे संतापलेल्या चवाथे याने शाळेच्या चौकशी समितीला शाळेचा अतिमहत्वाचा गोपनीय डाटा आपल्याकडे असून तो सगळीकडे व्हायरल करीन, अशी धमकी देऊन २० लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप शाळेकडून करण्यात आला आहे. अखेर या प्रकरणी शाळा प्रशासन आणि जुनियर अकाउंटट महिलेने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भोईवाडा पोलिसांनी निलेश चवाथे याच्याविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भोईवाडा पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version