पायधुनीत होता भारतीय बनावट नोटा छापण्याचा कारखाना !

पायधुनीत होता भारतीय बनावट नोटा छापण्याचा कारखाना !

टीसीएस भारतातील दुसरी सर्वाधिक मोठी कंपनी. ₹१२.८८ ट्रिलियनसह पहिल्या स्थानावर.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने पायधुनी परिसरात सुरू असलेला भारतीय नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारखान्यातून पोलिसांनी १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.

या प्रकरणी गुप्तवार्ता विभागाने शब्बीर हासम कुरेशी या ४७ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहेत. २००० रुपयांच्या ५३ नोटा या कारखान्यात सापडल्या.  पायधुनीच्या करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथेआरोपी रहात असून राहत्या घरीच तो या नोटा छापत होता.

 

हे ही वाचा:

अष्टपैलू कारकिर्दीची यशस्वी तीस वर्षे

भावना गवळींना ईडीचे समन्स मिळालेच नाही!

उपराष्ट्रपतींचे निवासस्थान कुठे असावे हे पण सामान्य माणसाला विचारायचे की काय?

मोदी सरकार मांडणार क्रिप्टोकरन्सीचे विधेयक

 

मागील अनेक दिवसापासून तो या नोटा छापत असून मुंबईच्या विविध बाजार पेठेत त्याने त्या वितरित केल्या आहेत. या प्रकरणी पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून शब्बीरला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत. शब्बीरवर यापूर्वीही एनडीपीएस अँक्ट अंतर्गत पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.

मार्च महिन्यातही वाकोल्यातून अशाच एका ३८ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने जवळपास एक लाखाच्या बनावट नोटा बांद्रा पूर्वेकडील बाजारात उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला होता. लॉकडाउनमुळे नोकरीधंद्याचा प्रश्न निर्माण झाल्याने राहुल चावडा याने घरातच अशा बनावट नोटा बनविण्यास सुरुवात केली होती.

त्याने ५० आणि १००च्या नोटा छापण्याची तयारी केली होती कारण या अशा बनावट नोटा पकडल्या जाणे फारसे शक्य नसल्याचा त्याचा अंदाज होता. त्याच्या घरातून असे ३० हजार रुपये सापडले होते.

Exit mobile version