धर्म परिवर्तन करून इस्लाम स्विकारण्यासाठी आपल्या पत्नी आणि मुलांवर दबाव टाकणाऱ्या एका इसमाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश मधील फतेहपुर जिल्ह्यात ही घटना घडली असून विजय सोनकर असे या आरोपीचे नाव आहे.
पेशाने ट्रक ड्रायव्हर असणारा विजय सोनकर हा फतेहपुर जिल्ह्यातील पुरमई या गावाचा रहिवासी आहे. विजय हा आपल्यावर आणि आपल्या मुलांवर धर्म परिवर्तन करून इस्लाम स्विकारण्याची जबरदस्ती करत असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने केली होती. खखरेरू पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विजयला अटक केली आहे.
हे ही वाचा:
पुदुचेरीला मिळाली पहिली महिला मंत्री
मी ओबीसी असल्यामुळे मला महसूल खातं मिळालं नाही
जपानमध्ये जे ‘झेन’ आहे, तेच भारतात ‘ध्यान’ आहे : पंतप्रधान मोदी
रविवार, २७ जून रोजी विजयला पोलिसांनी अटक केली असून अटक केल्यानंतर पोलिसांनी विजयाची कसून चौकशी केली. या चौकशीत विजयने सर्व हकीगत पोलिसांना सांगितली आहे. विजय हा ट्रक ड्रायव्हर आहे तर या पेशातील त्याच्या मित्रांपैकी अनेक जण हे मुस्लिम धर्मीय आहेत. या मित्रांच्या दबावाखाली येऊनच विजय सोनकर यांनी स्वतः धर्मपरिवर्तन केले असून त्याने इस्लाम धर्म स्विकारला आहे. तर त्याच्या पत्नी आणि मुलांनीही तो धर्म स्विकारावा अशी त्याची इच्छा आहे असा कबुलीजबाब विजय सोनकर याने दिला.
तर विजय सोनकर याच्या चौकशीत त्याने ही गोष्ट कबूल केली आहे की तो धर्म परिवर्तनासाठी त्याच्या पत्नीवर आणि मुलांवर दबाव आणत होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली असून विजय सोनकर ह्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.