25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामा'रेमडेसिवीर' काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न

‘रेमडेसिवीर’ काळा बाजाराचा मालवणी पॅटर्न

Google News Follow

Related

मालाडमधील मालवणी भागात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळक्याला पोलीसांनी अटक केली आहे. ही टोळी रेमडेसिवीर इंजेक्शनचा एक डोस २०,००० रूपयांना विकत होती. मालवणी पोलीसांनी सापळा लावून कारवाई करत या टोळक्याला अटक केली आहे.

महाराष्ट्रात कोविडचा विस्फोट झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील आरोग्यसुविधा अपुऱ्या पडत आहेत. ‘रेमडेसिवीर’ या कोविडच्या उपचारात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या इंजेक्शनचाही तुटवडा राज्यात जाणवत आहे. रेमडेसिवीरची मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी. याच परिस्थितीचा विचार करता भारत सरकारने काही दिवसांपूर्वी या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. पण लोकांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजाराच्या अनेक घटना समोर येत आहेत.

हे ही वाचा:

पुण्यातील व्यापारी लॉकडाऊन विरुद्ध उच्च न्यायालयात

उद्धव यांच्यापेक्षा राज एक पाऊल पुढे!

सीबीएसई परिक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय

अजित पवारांनी तेरा साखर कारखाने घशात घातले

अशाच एका काळाबाजाराची माहिती मालवणी पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी या काळाबाजार करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी एक सापळा रचला. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता चारकोप नाका येथे हा सापळा रचण्यात आला. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या एका खबरीला बनावट ग्राहक बनवून या टोळीकडे पाठवले आणि नंतर त्यांची धरपकड केली. यात आरिफ गालिब हुसेन मन्सूरीला या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. त्यासोबत त्याचा साथीदार सिद्धार्थ यादवलाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी आरिफ मन्सुरी हा स्वतः पेशाने डाॅक्टर आहे.

या दोघांची चौकशी केली असता चिरंजीव विश्वकर्मा नावाच्या पेशाने एमआर असणाऱ्या माणसाने त्यांना रेमडेसिवीरचा पुरवठा केल्याचे समोर आले. यानंतर पोलीसांनी सापळा लावून या विश्वकर्मालाही ताब्यात घेतले. विश्वकर्माच्या चौकशीत ही इंजेक्शन्स हयात हाॅस्पिटलमधील औषधांच्या दुकानातील असल्याचा गौप्यस्फोट त्याने केला.

या माहितीच्या आधारे पोलीस आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी हयात हाॅस्पिटलमधील औषधांच्या दुकानात छापा टाकला. त्यावेळी झाडाझडतीत अनेक संशयास्पद गोष्टी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या औषधाच्या दुकानाविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा