राम मंदिर हा मुद्दा हिंदुसाठी भावनिक असल्याचे जाणून फेसबुकवर तिघांनी यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे आता निदर्शनास आलेले आहे. ही घटना उत्तरप्रदेशातील बिजनौर येथे घडली. राम मंदिराचे सरचिटणीस चंपत राय यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुक या सोशल माध्यमावर लिहिण्यात आली. या प्रकरणाला अनुसरून उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातील पोलिसांनी अनिवासी भारतीय महिलेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्या कुटुंबियांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने फेसबुकवर पोस्ट लिहिण्यात आलेली होती. राय यांचा भाऊ संजय बन्सल यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे तिघांवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही कलम हे जामीनपात्र आणि आयटी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आले होते. विनित नारायण यांनी फेसबुक पोस्टमध्ये अलका लाहोटी या अनिवासी भारतीय महिलेची जमीन बळकावल्याचे म्हटले होते.
हे ही वाचा:
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
योग दिनानिमित्त एम. योगा अॅपची भारतीयांना भेट
कोरोना रुग्णसंख्येचा ८८ दिवसांचा नीचांक
मोदी सरकार आजपासून सर्व नागरिकांना मोफत लस देणार
बन्सल यांनी आरोप केला की, माजी पत्रकार विनीत नारायण यांनी चंपत राय आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बिजनौरच्या नगीना भागात मालमत्ता हडप केल्याचा आरोप करून फेसबुकवर पोस्ट केली. इंडोनेशियातून परतलेल्या अलका लाहोटी आणि रजनीश नारायण असे तिघांनी मिळून त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी तसेच देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी पोस्ट लिहिली. नगीना हे विहिंप नेते राय यांचे मूळ गाव आहे.
विनीत नारायण, अलका लाहोटी आणि रजनीश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी चंपत राय यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत फेसबुकवर एक अवमानकारक पोस्ट टाकली होती. आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. असे बिजनौरचे पोलिस अधीक्षक (एसपी) धर्मवीर सिंह यांनी माहिती दिली.
आयपीसी कलम १५३ अ आधारे (धर्माच्या आधारे समुदायात वैर वाढविणे), २९३ कलमांतर्गत (असंबद्ध गोष्टी सांगणे किंवा प्रसारित करणे) तसेच २९५ अ अंतर्गत (द्वेष पसरवणे) असे गुन्हे आता या तिघांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत. धार्मिक भावना भडकवण्याच्या हेतूने करण्यात आलेली ही पोस्ट असून, आता या सर्व गोष्टींची चौकशी करण्यात येणार असल्याचेही बिजनौरच्या पोलिसांनी सांगितलेले आहे.