कलश यात्रे दरम्यान दोन हिंदू तरुणांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार मालाडमध्ये घडला आहे. भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या दोन तरुणांना जीहाद्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. मालाड पूर्वच्या पिंपरीपाडामध्ये हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
गुढी पाडवा निमित्त पिंपरीपाडामध्ये काल (३० मार्च) कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कलश यात्रेचे समापन झाल्यानंतर सर्व जण घरी जात होते. याच दरम्यान, शांततेत दोन तरुण हातामधील भगवा झेंडा फडकवत पठाणवाडी परिसरातील मशिदी समोरून जात असताना मशिदी बाहेर जमलेल्या मुस्लिमांनी तरुणांच्या हातातील भगवा झेंडा खेचण्याचा प्रयत्न केला.
यामुळे वाद निर्माण झाला आणि दोन तरुणांना मुस्लिमांकडून मारहाण करण्यात आली. ४० ते ५० जणांच्या समूहाने तरुणांना मारहाण केली. या प्रकरणी तरुणांनी मालाडच्या कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे ही वाचा :
संभलमध्ये ईदच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त
बीड मशिद स्फोट प्रकरणात एटीएसकडून चौकशी
गुजरातमधील बंदूक परवाना घोटाळ्यात २१ अटकेत
GROK 3 सह स्टुडियो घिबली शैलीतील ईमेज कशी तयार करावी: सविस्तर वाचा
या घटनेनंतर हिंदू संघटनांनी संताप व्यक्त करत पोलिसांना इशारा दिला. जर हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा हिंदू संघटनांनी दिला आहे. या प्रकरणी कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरशान शेख याला अटक केली. तसेच इतरांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. सध्या परिसरात शांतात असून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.