26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामागडचिरोलीत सुरक्षा पथकाची मोठी कारवाई; पाच नक्षलवादी ठार

गडचिरोलीत सुरक्षा पथकाची मोठी कारवाई; पाच नक्षलवादी ठार

कोपर्शी- कोठीच्या जंगलात केली कारवाई

Google News Follow

Related

छत्तीसगडला लागून असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भाग असलेल्या भामरागड तहसीलमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. माहितीनुसार, आतापर्यंत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. या कारवाईत सुरक्षा दलाचे जवानही जखमी झाले आहेत. नक्षलविरोधी विशेष पथक सी- ६० चकमकीच्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गडचिरोली पोलिसांनी सोमवारी छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील कोपर्शी आणि कोठी गावांच्या जंगलात मोठी कारवाई केली. या चकमकीत पाच नक्षली ठार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोपर्शी- कोठीच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी एकत्र आल्याचे कळताच सी- ६० पथकाच्या जवानांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविण्यास सुरुवात केली. दुपारपासून तेथे चकमक सुरु असून, पोलिसांनी पाच नक्षल्यांना कंठस्नान घातल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवादविरोधी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अलीकडेच तेलंगणा पोलिसांनी एका महिला नक्षलवाद्याला अटक केली जिच्यावर पोलिसांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. सुजाता असे आरोपी महिलेचे नाव आहे. छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या अनेक मोठ्या नक्षलवादी घटनांमध्ये तिचा सहभाग होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तेलंगणातील हैदराबाद येथील महबूबनगर येथे उपचारासाठी गेली असता तिला अटक करण्यात आली.

माहितीनुसार, सुजाता ही नक्षलवादी नेता कोटेश्वर राव उर्फ किशनजी यांची विधवा आहे. २०११ मध्ये किशनजीची पोलिसांनी हत्या केली तेव्हा ती बंगालमधून बस्तरमध्ये आली होती. यानंतर ती येथे सक्रिय झाली आणि बस्तर विभागीय समितीच्या प्रभारीसह अनेक पदांवर नियुक्त करण्यात आली.

हे ही वाचा : 

उन्नावमध्ये मंदिर जिर्णोद्धाराला इस्लामी कट्टरतावाद्यांचा विरोध

सीमावाद निवळणार; प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या मुद्द्यावरून भारत- चीनमध्ये झाला करार

आझमगडमध्ये सामूहिक धर्मांतराचा डाव हाणून पाडला

‘भाजपा ईव्हीएम सेट करत असेल तर मतदार यादीत घोटाळा कशाला करतील?’

झारखंडच्या लातेहारमध्ये अलीकडेच पोलिसांनी एका मोठ्या खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश करून सहा जणांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपींवर स्वतःला नक्षलवादी सांगून लोकांकडून खंडणी घेतल्याचा आरोप आहे. नक्षलवाद्यांकडून चार रायफल, एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनिल यादवने पैसे उकळण्यासाठी टोळी तयार केली होती. माणिका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या जंगूर गावाजवळील जंगलातून त्याला प्रथम पकडण्यात आले आणि चौकशीदरम्यान त्याने दिलेल्या माहितीवरून टोळीतील इतर सदस्यांना अटक करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा