राजधानी दिल्लीत अग्नितांडव; सात जणांचा मृत्यू

राजधानी दिल्लीत अग्नितांडव; सात जणांचा मृत्यू

देशाचे राजधानीचे शहर असलेल्या दिल्लीत मोठी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील गोकुळपुरी परिसरात एक शुक्रवार, ११ मार्च रोजी रात्री उशिरा ही आग लागली आहे. गोकुळपुरी परिसरातील झोपडपट्टीला ही आग लागली होती. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनतर अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

दिल्लीतील गोकुळपुरी परिसरात असलेल्या झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री भीषण आग आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळवण्यात आले. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या आगीत ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. मात्र, आग लागण्याचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत या घटनेचा शोक व्यक्त केला आहे. सकाळी या घटनेची माहिती मिळाली असून ते स्वतः घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेणार असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

आईची भेट, आशीर्वाद आणि खिचडीचा आस्वाद

सपाच्या मतांची संख्या वाढली पण भाजपा सरसच!

‘कळसूत्री सरकारच पंचसूत्री अर्थसंकल्प’

चुकून सुटलेले भारतीय क्षेपणास्त्र थेट घुसले पाकिस्तानमध्ये

“आज पहाटे १ वाजता गोकुळपुरी पीएस परिसरात आग लागल्याची घटना घडली. सर्व बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. पहाटे चार वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली. यामध्ये ३० झोपड्या जळून खाक झाल्या, तर सात जणांचा मृत्यू झाला,” अशी माहिती ईशान्य दिल्लीच्या अतिरिक्त डीसीपींनी दिली आहे.

Exit mobile version