मुंबईच्या मानखुर्द परिसरात मंडाला भंगार बाजारातील गोदामाला आग लागली आहे. पहाटे तीनच्या सुमारास अचानक प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, प्रचंड आर्थिनेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
#WATCH | Fire breaks out in Mandala scrap market godowns in Mankhurd area of Mumbai
"We got info about the fire at around 3 am. 12 fire engines, 10 tankers along with 150 firefighters have been deployed for fire fighting operation. No casualty reported," said a fire officer pic.twitter.com/Zaf6KdkIcN
— ANI (@ANI) November 12, 2021
पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागताच या प्रकरणाची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १२ फायर इंजिन व १० टँकर्स घटनास्थळी पोहोचले आहेत. तब्बल १५० जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली. हा परिसर गर्दीचा व दाटीवाटीचा आहे. आग इतरत्र पसरू नये म्हणून अग्निशमन दलाला काळजी घ्यावी लागत आहे.
हे ही वाचा:
ऑफिसच्या वेळेनंतर बॉसने फोन करणे आता बेकायदेशीर
WHO: सगळीकडे कोविड केसेस कमी, अपवाद फक्त…
राज ठाकरे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ पण…
मुनगंटीवारांचा ‘तो’ व्हिडिओ अर्धवट
मानखुर्द परिसरात दाट लोकवस्ती असल्यामुळे आग वाढत गेली, तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. मानखुर्द पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे.