25 C
Mumbai
Tuesday, November 19, 2024
घरक्राईमनामाझवेरी बाजारात भिंतीत लपवले होते १० कोटी आणि चांदीच्या विटा

झवेरी बाजारात भिंतीत लपवले होते १० कोटी आणि चांदीच्या विटा

Google News Follow

Related

जीएसटी चोरीच्या राज्यात अनेक घटना घडत आहेत. मुंबईतून अशीच एक मोठी घटना समोर आली आहे. राज्य जीएसटी विभागाने मुंबईतील झवेरी बाजार परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली जवळपास दहा कोटींची रोख रक्कम आणि १९ किलोच्या चांदीच्या विटा सापडल्या आहेत.

मुंबईतील झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल २०१९-२० मध्ये २२ कोटी ८३ लाख रुपयांवरून २०२०-२१ मध्ये ६५२ कोटी आणि २०२१-२२ मध्ये १ हजार ७६४ कोटी रुपयांवर गेली. वर्षात एवढी उलाढाल झपाट्याने वाढत असल्याने राज्य जीएसटी विभागाला संशय आला आणि जेव्हा जीएसटी विभागाने विश्लेषण केले तेव्हा संशय अजून वाढला.

त्यांनतर राज्य जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखेची जीएसटी साठी नोंद नसल्याचे आढळून आले. कंपनीच्या ३५ चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपये किंमतीच्या १९ किलो चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. राज्य जीएसटी विभागाने ही जागा सीलबंद केली असून, आयकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. आयकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

‘मातोश्री मंदिर आहे तर, आम्हाला का रोखले जात आहे’

अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड

गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

आयकर विभागाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटीची चोरी शोधणे आणि कारवाई करण्याची मोहीम तीव्र केली आहे. दरम्यान, जीएसटीने झवेरी बाजारात केलेल्या या कारवाईवरून ‘स्पेशल 26’ या चित्रपटाची आठवण झाली. २०१३ साली प्रदर्शित झालेला ‘स्पेशल 26’ या चित्रपटात सीबीआयने केलेली कारवाई आणि अनेकांचा काळा पैसा जप्त केला होता, असे या चित्रपटात दाखवले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
192,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा