राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने मोठी कारवाई करत परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणारी टोळी उध्वस्त केली आहे. एनआयएने महाराष्ट्रासह देशभरातील १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. या प्रकरणात पाच जणांना अटक देखील करण्यात आली आहे.
परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक होत असल्याची तक्रार एनआयएकडे आली. त्यानंतर एनआयने तपास करत छापेमारी सुरु केली. वडोदरा येथील मनीष हिंगू, गोपालगंजचा पहलद सिंग, दक्षिण-पश्चिम दिल्लीचा नबियालम रे, गुरुग्रामचा बलवंत कटारिया आणि चंदीगडचा सरताज सिंग यांना अटक केली. एनआयएने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली अशा १५ ठिकाणी कारवाई करून आरोपींना अटक केली. एनआयएने स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन ही कारवाई केली. या प्रकरणात आठ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच एनआयएच्या अधिकाऱ्यांना या छाप्यांदरम्यान संशायस्पद कागदपत्रे मिळाली आहेत. त्यात कॉम्प्युटरमधील डाटा, वेगवेगळ्या देशांचे पासपोर्ट, डिजिटल डिव्हाईस, कर्मचाऱ्यांचे नियुक्तीपत्र आदी गोष्टींचा समावेश आहे.
5 Arrested after Multi-State Searches Conducted Jointly by NIA and State Police in Human Trafficking & Cyber Frauds Case pic.twitter.com/ubnMRgMtLk
— NIA India (@NIA_India) May 28, 2024
हे ही वाचा:
ब्रिटनमध्ये आता प्रत्येकाला व्हावे लागेल लष्करात भर्ती
‘केजरीवाल संधीसाधू, दिग्विजय अनुभवशून्य’
पराभवाचे खापर भाऊ-बहिणींवर नाही, तर तुमच्यावर फुटणार.. खर्गे साहेब तुमची नोकरी जाणार!
ठाकरेंच्या लंडन दौऱ्याचा एजेंडा काय?
माहितीनुसार, भारतीय तरुणांना परदेशात चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून तिकडे नेले जात होते. त्यानंतर या तरुणांना लाओस, गोल्डन ट्रँगल स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) आणि कंबोडिया येथे बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडले जात होते. त्या ठिकाणांवरून या तरुणांकडून क्रेडिट कार्ड फसवणूक, बनावट अर्ज वापरून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे, हनी ट्रॅपिंग इत्यादीसारख्या बेकायदेशीर प्रकार करुन घेतले जात होते. तरुणांची फसवणूक करण्यासाठी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये त्यांनी जाळे पसारले होते. या प्रकरणातील आरोपीच्या तावडीतून सुटलेल्या ठाण्याच्या सिद्धार्थ यादव या तरुणाने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता.