28 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामादिल्लीतील अलीपूरमधील रंग कारखान्याला आग; ११ जणांचा होरपळून मृत्यू!

दिल्लीतील अलीपूरमधील रंग कारखान्याला आग; ११ जणांचा होरपळून मृत्यू!

मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

Google News Follow

Related

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा भीषण आगीची घटना घडली आहे. दिल्लीच्या अलीपूरमधील रंगांच्या कारखान्यात आग लागली आहे. त्यात ११ जणांचा होरपळून मृत्यू तर चारजण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या २२ गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

मृतदेह होरपळल्यामुळे त्यांची ओळख पटवणेही मुश्कील झाले आहे. हे सर्व कारखान्यांमधील कामगार होते, असे सांगितले जात आहे. ते आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याचवेळी रंगासाठी लागणाऱ्या रसायनांच्या ड्रमचा विस्फोट झाला. आगीची घटना इतकी भयंकर होती की, मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारखान्याच्या आत शोधमोहीम राबवली जात आहे.

हे ही वाचा:

इस्रायलच्या हवाईहल्ल्यात तीन हिजबुल्लाह कमांडरचा मृत्यू!

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

हल्दवानी हिंसाचार: मशिदींमध्ये शुक्रवारच्या नमाजावर बंदी!

‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’

दिल्लीतील अलीपूर हा दाट लोकसंख्येचा भाग आहे. याच गर्दीच्या भागात हा कारखाना चालवला जात होता. गुरुवारी संध्याकाळी येथे आग लागली आणि येथील रसायनांमुळे आग पसरत गेली. त्यामुळे कारखान्यातील मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. काही जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तर काहींचा जागीच मृत्यू झाला. मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.

२६ जानेवारीलाही आगीची घटना
२६ जानेवारी रोजी दिल्लीतील शहादरा भागातील रबर कारखान्यात आग लागली होती. त्याच चौघांचा होरपळन मृत्यू झाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा