चार दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील कानपूर देहाटमध्ये एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह ३ आरोपींना अटक केली आहे.या हत्येप्रकरणी पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे.सिगारेट ओढण्यावरून तरुणाची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.तरुणाने आरोपीला सिगारेट देण्यास नकार दिल्यानेच ही हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
१० फेब्रुवारी रोजी सकाळी अमराहत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना कॅनॉल पंप कॅनॉलमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.या प्रकरणाची माहिती पोलिसांना.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगडही पोलिसांना आढळून आला होता. या दगडाने तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा:
येरवाडा कारागृहात आरोपींकडून कारागृह अधिकाऱ्याला मारहाण
“अरब देश पाकिस्तानऐवजी भारताची निवड करतायत”
अबुधाबीनंतर बहरीनमध्ये साकारणार भव्य हिंदू मंदिर
बबन घोलप यांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र!
मृत तरुणाचे नाव मैनुद्दीन असे असून तो तो औरैया येथील रहिवासी आहे.पोलिसांनी तपास केला असता, मृत तरुण अमरहाट पोलीस स्टेशन हद्दीतील खोजाफूल येथील त्याच्या मामाच्या घरी हा राहत होता.या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह तीन आरोपींना अटक केली.विनय बाबू उर्फ चड्ढा, मनीष सिंग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.तसेच या हत्याकांडात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, हे तिघे आरोपी मृत मैनुद्दीन यांच्याकडे सिगारेट मागत होते.मात्र, मैनुद्दीनने याना नकार दिला.त्यामुळे संतापलेल्या तिन्ही आरोपींनी मैनुद्दीनला शिवीगाळ केली.त्यानंतर या तिघांनी मैनुद्दीनला दारू देण्याच्या बहाण्याने यमुना कालव्याच्या पंपाजवळ नेले.या ठिकाणी तिघांनीही त्याच्यावर दगडाने वार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह कालव्यात टाकून पळ काढला.या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.