वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आली होती. यानंतर मिहीर शाहला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मिहीर शाह याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अपघातानंतर फरार झालेल्या मिहीर शाह याला शोधण्यासाठी पोलिसांनी ११ पथके स्थापन केली होती.
वरळी हिट अँड रन प्रकरणात महिलेचा मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर त्यावेळी गाडी चालवत असलेला मिहीर शाह फरार होता. मिहिर शाहच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ११ पथके स्थापन केली होती. अखेर मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शाहला शाहपूर येथून अटक केली. त्यानंतर त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने १६ जुलै पर्यंत मिहीर शाहला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी त्याच्यासह १२ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या १२ जणांमध्ये आरोपी मिहीर शाहच्या आईचा आणि बहिणीचा देखील समावेश आहे. या १२ जणांनी आरोपी मिहीर शाहला पळून जाण्यास मदत केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशी दरम्यान मिहीर शाह याने कबुली देत म्हटले आहे की अपघातावेळी गाडी तो स्वतः चालवत होता. तर, बहिणीने म्हटलं की, या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल, या भीतीने आम्ही घर सोडले.
हे ही वाचा:
“गाडी मीच चालवत होतो” वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहची कबुली
‘आम आदमी’ राजकुमार आनंद बसपातून भाजपात !
ऑस्ट्रियात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी वाजले ‘वंदे मातरम’
राहुल द्रविड म्हणाला, मला ५ कोटी नको, अडीच कोटीच द्या!
दरम्यान, यापूर्वी या प्रकरणी मिहीर शाह यांचे वडील राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. यानंतर राजेश शाह यांना १५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला होता. आरोपी मिहीर शाह हा अपघातापूर्वी जुहूतील ग्लोबल तपस बारमध्ये दारू प्यायल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या दोन दिवसांच्या तपासानंतर बार वर कारवाई केली आहे. बारचालकाकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार सील केला आणी नंतर बुधवारी बार वर बुलडोझर चालवत कारवाई केली आहे.