एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरी चोरी झाल्याची घटना उजेडात आली आहे . समीर वानखेडे यांची अभिनेत्री पत्नी क्रांती रेडकर यांचे साडे चार लाख रुपये किंमतीचे मनगटी घड्याळ घरातून चोरीला गेले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात संशयित चोर म्हणून मोलकरीण विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे पत्नी क्रांती रेडकर सह गोरेगाव पश्चिम येथे राहण्यास आहे.त्यांची पत्नी क्रांती रेडकर मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तसेच चित्रपट निर्मात्या आहेत. घरात पूर्णवेळ काम करण्यासाठी आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी मोलकरीण हवी असल्यामुळे क्रांती यांनी ओळखीच्या व्यक्तीस सांगितले होते. २० डिसेंबर पासून मंतशा खातून ही मोलकरीण म्हणून वानखेडे यांच्या घरी कामाला लागली होती.
२६ डिसेंबर रोजी मोलकरणी मंतशा ही पतीसोबत भांडण झाल्याचे कारण सांगून लवकर निघून गेली होती, त्यानंतर क्रांती यांनी त्यांचे ओमेगा कंपनीचे साडे चार लाख किमतीचे मनगटी घड्याळ घालण्यासाठी कपाटात शोधले परंतु त्यांना ते मिळून आले नाही.संपूर्ण घरात घड्याळ शोधून देखील न मिळाल्याने मंतशा हिने घड्याळ चोरी केल्याच्या संशय क्रांती रेडकर यांना आला व त्यांनी या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात मोलकरीण विरोधात चोरीची तक्रार केली.
पोलिसानी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे सांगितले.
हे ही वाचा:
सानिया मिर्झाचा टेनिसला अलविदा
संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार
‘द रेझिस्टन्स फ्रंट’ दहशतवादी संघटनेवर बंदी
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आली होती, तेव्हा नार्कोटिक्स ब्युरोचे मुंबई झोनचे प्रमुख समीर वानखेडे होते. त्यावेळी त्यांच्यावर तत्कालिन मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केले होते. मात्र अखेरीस मलिकच तुरुंगात गेले.