25 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामावीजचोरी पकडणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला

वीजचोरी पकडणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला

पोलिस कर्मचारी जखमी; मानपाडा पोलिसांत गुन्हा दाखल

Google News Follow

Related

वीजचोरी शोध मोहिमेवरील महावितरणच्या भरारी पथकावर डोंबिवली नजिकच्या खोनीगाव (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे बुधवारी (२४ मे) दुपारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात पथकातील एक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून इतर सात जणांना हल्लेखोरींनी धक्काबुक्की, शिवीगाळ व धमकावले आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान व इतर कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

रजिंत भगवान ठोंबरे, मारुती मोतीराम ठोंबरे, हरेष श्रीराम ठोंबरे, बायमाबाई भगवान ठोंबरे, अंकीता रंजित ठोंबरे, राजीन ठोंबरे, सचिन श्रीराम ठाकरे, भगवान ठोंबरे, सचिन ठाकरेचा भाऊ (नाव माहित नाही) आणि इतर सहा ते सात अनोखळी व्यक्ती (सर्व राहणार खोनीगाव) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची तीन पथके कल्याण पश्चिम उपविभाग एक अंतर्गत खोनीगाव परिसरात वीजचोरीच्या विशेष शोध मोहिमेवर होती. यातील उपकार्यकारी अभियंता राजेश म्हसणे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने खोनीगाव येथील श्रीधर भगवान ठोंबरे, रंजित भगवान ठोंबरे व बायमाबाई भगवान ठोंबरे यांच्या दुमजली बंगल्यातील वीज पुरवठ्याची तपासणी केली. यात दोन मीटर बायपास करून थेट वीजचोरी सुरू असल्याचे तर एका मीटरमध्ये फेरफार करून मीटरचा वेग कमी केल्याचे आढळले.

हे ही वाचा:

बिजू जनता दलाचे ठरले! संसद भवन कार्यक्रमाला उपस्थित राहणार

व्हिएतनाममध्ये अदानी कंपनी करणार गुंतवणूक

कोकणातील गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात कसे फुल होते?

मुंबई इंडियन्स ‘आकाश’ भरून पावले

त्यानुसार संबधित वीज मिटर जप्त करून पथक इतरत्र निघाले असता रंजित ठोंबरे याने जमाव जमा करून पथकाच्या वाहनावर दगडफेक केली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचारी एस. एम. वाघमारे यांना काठीने मारहाण केली. पथकातील इतर दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह, एक वाहनचालक, महावितरणचे चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिविगाळ व गावात परत आल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली.

दगडफेक करून वाहनाचे नुकसान करत जप्त केलेले मीटरही हिसकावून नेले.आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ३३२, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ सह डॅमेज ऑफ पब्लिक प्रॉपर्टीचे कमल ७, मुंबई पोलिस कायदा कलम ३७ (३), १३५ नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा