लाईट बिल जास्त आल्याने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने १६ वार!

बारामतीमधील घटना

लाईट बिल जास्त आल्याने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने १६ वार!

बारामती मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.लाईट बिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाने महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार केले आहेत.या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.या विचित्र घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील महावितरण कंपनी कार्यालयात ही घटना घडली.वीज बिल जास्त आल्याने जाब विचारायला गेलेल्या तरुणाने या कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने तब्बल १६ वार केले.या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला.रिंकू गोविंदराव बनसोडे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव असून त्या मुळच्या लातूर येथील रहिवासी आहेत.मृत रिंकू या गेल्या दहा वर्षापासून मोरगाव येथेच काम करत होत्या.त्यांचे लग्न झाले असून त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे.

हे ही वाचा:

“नकली शिवसेनेने सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळा टाळला”

संजय राऊतांचे निकटवर्ती प्रवीण राऊतांची ७३ कोटींची मालमत्ता जप्त

भाषणादरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ, स्टेजवर कोसळले!

नुडल्सच्या पाकिटात होते दोन कोटींचे हिरे

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार(२४ एप्रिल) ११.३० च्या सुमारास ही घटना घडली.कार्यालयात त्या एकट्या असताना एक तरुण त्यांच्याकडे येऊन त्यांना विजेच्या अतिरिक्त बिलाबाबत चौकशी करू लागला.तरुणाने जाब विचारत काही कळायच्या आत महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली.तोंडावर आणि हातापायावर असे एकूण १६ वार केले.या हल्ल्यानंतर महिलेला पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आले आहे.अभिजीत पोटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version