पंजाब-महाराष्ट्र एटीएसची कारवाई; खत्री गँगमधील तिघे अटकेत

खून, दरोडे, खंडणी प्रकरणी पोलिस शोध घेत होते

पंजाब-महाराष्ट्र एटीएसची कारवाई; खत्री गँगमधील तिघे अटकेत

पंजाबमधील गँगस्टर सोनू खत्रीशी संबंधित तीन शूटर्सना सोमवारी कल्याणजवळ आंबिवली येथून पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या तिघांना ताब्यात घेतले.पंजाब पोलीस आणि महाराष्ट्र एटीएसने ही संयुक्त कारवाई केली.

तीनही आरोपी हे फरार होते पंजाब पोलीस त्यांचा शोध घेत होते. पंजाब पोलिसांनी महाराष्ट्र एटीएसची मदत मागत तिन्ही आरोपी कल्याणमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी मदत मागितली.

त्यानुसार महाराष्ट्र एटीएस आणि पंजाब पोलीस यांनी सापळा रचून शिवम महालो,गुरुमुख सिंग ऊर्फ गोरा आणि अमरदीप गुरुमेलचंद उर्फ रँचो या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर याआधी खून, दरोडे, अपहरण,खुनाचा प्रयत्न,बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अश्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

धारावीत लव्ह जिहाद; गोमांस खात नसल्यामुळे विवाहितेची हत्या

जितेंद्र आव्हाड गीता आणि कुराण घेऊन म्हणतात, मी कायदा हातात घेईन!

आम्ही तुझ्या सगळ्या ऍलर्जीवर उपचार करू!

न पुन्हा कोरोना पसरवतोय?

गेल्या वर्षी जून महिन्यापासून हे तिघे आंबिवली येथे राहात होते, अशी माहिती उपमहाअधीक्षक राजन परमिंदर यांनी दिली. परमिंदर हे पंजाबच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख आहेत. या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसची ठाणे शाखा, पंजाब दहशतवादविरोधी पथक आणि खडकपाडा पोलिस यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवत तिघांना अटक केली. पोलिसांनी सांगितले की, पकडण्यात आलेल्या तिघांनी सांगितले की, ते दहशतवादी हरविंदर सिंग तथा रिंदा याच्या संपर्कात होते. तसेच पंजाबचा गॅंगस्टर सोनू खत्रीच्या गँगमधील ते सदस्य होते. या तिघांवर खून, दरोडे, खंडणी यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पंजाबमध्ये खत्री गँगचा माखनसिंह याच्याशी उभा दावा होता. त्यातून माखनसिंहला मारण्याची सुपारी खत्रीने दिली होती. सहा शूटर्सनी मिळून २० गोळ्या माखनसिंहवर डागल्या. त्यातील या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version