पुणे रेल्वे स्थानकाला एका अज्ञात इसमाने काल रात्री फोन करून बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. ही धमकी मिळताच रेल्वे पोलीस सतर्क झाले आहेत. पोलीस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळाची पाहणी केली आहे.पोलिसांनी तात्काळ सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलं आहे. यावेळेस रेल्वे स्थानकांत बॉम्ब ठेवल्याचं प्रवाशांना कळल्यावर प्रवाशांची सुद्धा घाबरगुंडी उडाली. स्वतःचा जीव मुठीत घेऊन लोक पळत होते.
खबरदारीची काळजी म्हणून रेल्वे स्थानकाचा संपूर्ण परिसर श्वान पथकाने पिंजून काढला. यात रेल्वे फ्लॅट,फलाटावरील प्रत्येक खोली, पूर्ण गाड्या बघितल्या पण पोलिसांना काही हाती लागले नाही. त्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानकात सोडण्यात आले. यावेळी रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली असून एखादी संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्यांची माहिती देण्याचं आवाहनही करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास
कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी
महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती
दरम्यान हा धमकीचा फोन कुणी केला, कुठून आला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस त्याचा शोध घेत असून पोलिसांनी वर्दळीच्या या रेल्वेस्थानकाची सुरक्षा अधिक वाढवली असून प्रत्येकाच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं जात आहे. खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे.
२६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून पुणे रेल्वे स्थानक, कामशेत रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी दिली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. रात्री दोन पासून पुणे रेल्वे स्थानक आणि कामशेत रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.त्यामुळे पोलिसांनी रात्रीपासूनच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी सुरू केली आहे.आलेल्या फोन कॉलचा तपास करण्याचं काम सुरू आहे. पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.