वाकोल्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर आ. भातखळकर यांची प्रतिक्रिया
साकीनाका प्रकरण ताजे असताना मुंबईत पुन्हा एक बलात्काराची घटना घडलेली आहे. मुंबईत वाकोला येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय. कायदा सुव्यवस्था नावालाही उरलेली नाही. महिला असुरक्षित आहेत. राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी ठाकरे सरकारने पोलिसांचा सातत्याने वापर केल्याचे हे परिणाम आहेत, अशा परखड शब्दांमध्ये भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.
वाकोला पोलिसांनी नुकतीच एका १५ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली दोन तरुणांना अटक केली. आरोपी आणि पीडित दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे, मुलीचा आरोप आहे की २ सप्टेंबर रोजी एका आरोपीने मुलीला त्याच्या घरी बोलावले. घरी येण्यास नकार दिल्यास तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी दिली.
मुंबईत वाकोला येथे १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय.
कायदा-सुव्यवस्था नावालाही उरलेली नाही. महिला असुरक्षित आहेत. राजकीय हिशोब चुकते करण्यासाठी ठाकरे सरकारने पोलिसांचा सातत्याने वापर केल्याचे हे परिणाम आहेत.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 20, 2021
मुलगी त्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याने आणि मित्राने मिळून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. नंतर मुलीने पळ काढला. त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिचा जबाबही यावेळी नोंदविण्यात आला. आरोपी मुलांना आयपीसी आणि पीओसीएसओ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आरोपी पीडिता एकमेकांना ओळखत असल्याची माहिती वाकोला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.
हे ही वाचा:
चाळीसपेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना मिळणार ही घसघशीत वाढ
ठाणे भाजपा सोशल मीडिया सेलतर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धा
येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील
५ ते ११ वयोगटासाठी फायझरची नवी लस लवकरच उपलब्ध होणार
वाकोला पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांखाली तक्रार नोंदवली आहे. राज्यातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांमुळे महिलांसाठी आता महाराष्ट्र सुरक्षित आहे का असाच प्रश्न पडू लागलेला आहे. गेल्या महिन्याभरापासून दिवसाआड एकतरी बलात्काराची बातमी कानावर येऊ लागलेली आहे.