25 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामाधुळ्यात डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक!

धुळ्यात डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीवर दगडफेक!

इसाक, कल्लू पठाण, साहिल यांच्यासह सात जणांना अटक

Google News Follow

Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रविवारी धुळ्यात निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेक केल्याप्रकरणी पोलिसांनी विशिष्ट समुदायातील २१ जणांवर गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी साहिल लाला बागवान, समीर लाला बगवान, इसाक मिस्त्री, कल्लू पठाण, विहान बागवान, कौसार मुस्सा खाटिक आणि अज्या खाटिक यांना अटक केली आहे. या प्रकरणी २१ जणांवर भारतीय दंडसंहिता १८६० कलम १४३, १४६, १४७, १४९, २९५ आणि २९६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपींवर अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही मिरवणूक १४ एप्रिल रोजी जामा मशिदीजवळून जात असताना ही घटना घडली. ही मिरवणूक मशिदीजवळून जात असताना एका विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींनी ती अडवली आणि त्यानंतर मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी लगेचच पोलिस ठाण्यात कळवले. त्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आली. गोविंदा गुलाब नागराळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

दिनेश कार्तिकच्या ८३ धावा ठरल्या अपुऱ्या

‘निवडणूक रोखे मागे घेतल्याने प्रत्येकाला पश्चात्ताप होईल’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक

मीरारोडमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा संताप; चिकन दुकानदाराने ४ वर्षांच्या मुलीवर केला अत्याचार

‘मिरवणूक शांततेने जामा मशिदीजवळून जात असताना एका विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींनी मिरवणूक थांबवून मिरवणुकीत सहभागी असलेल्यांना धमकावले. त्यांनी मिरवमूक मशिदीजवळून नेण्यास मज्जाव केला. त्यानंतर त्यांनी मिरवणुकीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दगडफेक करताना ते घोषणाही देत होते. या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले,’ असे नागराळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

नागराळे यांनी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांची ओळखही पटवली आहे. त्यातील काहींची नावे पापा शाह, सादिक शाह, वासिम पठाण, सुल्तान बिल्डर, जुनैद शाह, तौफिक, शोएब अशी आहेत. पोलिस मात्र ही घटना किरकोळ असल्याचे सांगत आहेत. ‘ही अत्यंत किरकोळ घटना आहे. त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे,’ असे धिवारे यांनी स्थानिक वृत्तपत्राला सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा