भारतात बेकायदेशीररित्या घुसखोरी करून राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोहीम उघडली आहे.मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शिवडी, नवीमुंबई वडाळा या ठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली असून त्यातील दोघे जण बांगलादेशी एजंट आहेत. या एजंटमार्फत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक चोरट्या मार्गाने मुंबई, ठाणे, नवी मुंबई येत होते.
भारतीय असल्याचे पुरावे बनवून देण्यासाठी व त्यांची राहण्याची व्यवस्था करून देण्यासाठी हे एजंट प्रत्येक बांगलादेशी नागरिकांकडून २०ते २५ हजार रुपये घेत होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.काही दिवसांपूर्वी मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ च्या पथकाने शिवडी येथून दोन बांगलादेशी एजंट आणि नवी मुंबई येथुन एका महिलेला अटक केली होती. या एजंटच्या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली होती, हे एजंट २० हजार रुपये घेऊन बंगालदेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणत आहे, तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचे बोगस आधारकार्ड तयार करून मुंबई, ठाणे, नवीमुंबईतील झोपडपट्टीत भाड्याने घरे घेऊन देतात, त्याच बरोबर हे एजंट बांगलादेशी नागरिकांचे बांगलादेश आणि भारतातील आर्थिक देवाणघेवाणसाठी हवालाचा वापर करीत होते.
हे ही वाचा:
कांद्यासह इतर उत्पादनांच्या निर्यात बंदीचे सीतारामन यांच्याकडून समर्थन
संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे झाली; त्याचदिवशी संसदेत शिरले दोन घुसखोर
गाझामधील तत्काळ युद्धविरामाच्या ठरावाच्या बाजूने भारत
जम्मू काश्मीरमध्ये बांधला जातोय दहशतवाद्यांसाठी भलामोठा तुरुंग
या दोन्ही एजंट यांनी मागील काही वर्षांत अनेक बंगालदेशीना भारतात बेकायदेशीर पणे आणले असल्याची माहिती चौकशीत उघड झाली. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेने मुंबई सह आजूबाजूच्या शहरात आपली बेकायदेशीर राहणाऱ्या बंगालदेशी नागरिकांचा शोध घेऊन मंगळवारी ५ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट आधारकार्ड मिळून आले आहे.गुन्हे शाखेने या गुन्ह्यात आतापर्यत ९ बांगलादेशी नागरिकांना बोगस कागदपत्रासह अटक केली आहे.बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशीचा आणखी बांगलादेशीचा शोध घेण्यात येत आहे.