बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणात संशयित असलेल्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका लावण्यात आला असून खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. केज सत्र न्यायालयात त्याच्या पोलीस कोठडीवर सुनावणी झाली.
वाल्मिक कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली. त्यानंतर केज न्यायालयात सुनावणी झाली, त्यावेळी हा निर्णय देण्यात आला आहे. या सुनावणी दरम्यान सीआयडीने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने कराड याला न्यायालयीन कोठडी सुनावली. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याचा ताबा एसआयटी घेण्याची शक्यता आहे. तसेच वाल्मिक कराडला मकोका लावल्यानं आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
न्यायालयात सुनावणीला सुरुवात होताच तपास अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडची १० दिवसाची पोलीस कस्टडी मागितली. व्हाईस सॅम्पल घेतला गेला आहे. तीन मोबाईल कराड याचे जप्त केले आहेत. संपत्ती कोणत्या गुन्ह्यातून कमावली आहे का हे तपासायचे म्हणून कोठडी हवी आहे, असं तपास अधिकारी अनिल गुजर म्हणाले. भारतात अथवा भारताबाहेर काही संपत्ती आहे का?, याचा तपास करायचा आहे, असंही तपास अधिकारी म्हणाले.
हे ही वाचा :
प. बंगाल मध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या
शिक्षण विभागाच्या योजना मिशन मोडवर राबवा
पानिपत मराठी माणसाची भळभळती जखम अन अभिमानही!
दिल्लीत केजरीवाल-काँग्रेस यांच्यात जुंपली
दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने न्यायालयात अर्ज केला आहे. सीआयडीला खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी मागणी सीआयडीने केली आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचा आहे.