28 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामा३२ वर्षांपूर्वी केलेल्या हत्येसाठी माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप! काय आहे नेमकं प्रकरण?

३२ वर्षांपूर्वी केलेल्या हत्येसाठी माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप! काय आहे नेमकं प्रकरण?

वाराणसी एमपी एमएलए न्यायालयाचा निर्णय

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील एमपी एमएलए न्यायालयाने अवधेश राय यांच्या खून प्रकरणात माफिया मुख्तार अन्सारी याला दोषी ठरवले आहे. न्यायालयाने ३२ वर्षांपूर्वीच्या एका खटल्यासंदर्भात सोमवार, ५ जून रोजी झालेल्या सुनावणीत अन्सारी याला दोषी ठरवले आहे.

अवधेश राय हत्याकांड प्रकरणी वारणसीच्या एमपी एमएलए न्यायालयाने सोमवारी मुख्तार अन्सारी याला दोषी ठरवून दंड आणि शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने हत्याकांडातील दोषी मुख्तार अन्सारी याला जन्मठेप सुनावली आहे. आयपीसीच्या कलम ३०२ अंतर्गत मुख्तार अन्सारी यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत. मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश माजी आमदार अब्दुल कलाम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान या पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.

या महत्त्वाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वाराणसी न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काय आहे अवधेश राय हत्या प्रकरण?

अवधेश राय हे काँग्रेस नेते अजय राय यांचे छोटे बंधू होते. अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाणे परिसरात झाली. ते अजय राय यांच्या घराबाहेर उभे असताना व्हॅनमधून आलेल्या काही इसमांनी अवधेश यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

बेपत्ता लोकांच्या शोधाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांचे डोळे डबडबले!

‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल

प्रयागराजमध्ये महिला पोलिसालाच बसला ‘लव्ह जिहाद’चा फटका

रेल्वे अपघातामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार अदानी, सेहवाग उचलणार

या हत्याकांडानंतर माजी खासदार अजय राय यांनी चेतगंज पोलिस ठाण्यात मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश यांच्यासह माजी आमदार अब्दुल कलाम यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. अखेर ३२ वर्षांनंतर त्यांना न्याय मिळाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा