राजू असल्याचे भासवून मोहम्मद शब्बीरचा हिंदू मुलीवर बलात्कार!

पोलिसांकडून आरोपीला अटक

राजू असल्याचे भासवून मोहम्मद शब्बीरचा हिंदू मुलीवर बलात्कार!

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण समोर आले आहे. मोहम्मद शब्बीर नावाच्या व्यक्तीने एका हिंदू मुलीशी मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने स्वतःचे नाव राजू असल्याचे सांगून तो हिंदू धर्माचा असल्याचा दावा केला.

वृत्तानुसार, हिंदू महिला आधीच विवाहित होती आणि तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. दरम्यान, तिची शब्बीरशी भेट झाली ज्याने तिला विश्वास दिला की तो हिंदू आहे आणि त्याला तिच्याबद्दल प्रेम वाटते.तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा पुरुष प्रत्यक्षात मुस्लिम असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. तिने सांगितले की, आरोपीने आपले नाव राजू असल्याचे सांगून तिच्याशी खोटे बोलले. नंतर मात्र त्याने आपण मुस्लिम असल्याचे मान्य केले.

हे ही वाचा:

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ‘भारत’सह ‘इंडिया’ही!

मानवी चूक, सिग्नलकडे दुर्लक्ष, स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेत बिघाड…

भाऊ, वडिलांना मारून टाकण्याची धमकी देत हिंदू बहिणींवर लग्नासाठी दबाव!

अण्वस्त्रांच्या संख्येत भारत पाकिस्तानच्या पुढे

फिर्यादीत महिलेने म्हटले आहे की, आरोपीने तिला त्याचा इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले आणि शिवीगाळही केली आणि त्याला सहमती देण्यास नकार दिल्यावर तिला मारहाण केली. आरोपीने तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचेही तिने सांगितले. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तिने सांगितले.

पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून एका हिंदू महिलेवर बलात्कार आणि अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. ‘त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला त्याचा इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, आरोपीवर राज्यातील धर्मांतर प्रतिबंध कायद्याची संबंधित कलमे लावण्यात आली आहेत,’ असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version