मध्य प्रदेशाच्या इंदोरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोनू कल्याणे असे हत्या करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव असून त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. तसेच मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा ते निकटवर्तीय असल्याची माहिती आहे.
शहरातील चिमणबाग परिसरात रविवारी(२३ जून) पहाटेच्या वेळेस ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष आणि अर्जुन या दोन व्यक्तींनी मोनू कल्याणे यांच्यावर गोळ्या झाडल्या असून पूर्व वैमनस्यातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपी मृत मोनू कल्याणे यांच्या शेजारीच राहत होते. आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा:
अरविंद केजरीवाल यांचे वजन घटू लागले !
महिला कॉन्स्टेबलसोबतची लगट भोवली!
‘सामना’च्या कार्यालयाबाहेर संजय राऊतांना बॅनरमधून आव्हान!
लैंगिक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या भावालाही अटक!
पोलिसांनी पुढे सांगितले की, भगवा वाहन रॅलीसाठी शहरातील चिमणबाग परिसरात बॅनर आणि पोस्टर लावण्याचे काम मोनू कल्याणे करत होते. त्याचदरम्यान पियुष आणि अर्जुन हे दोघे दुचाकीवरून त्याच्याजवळ आले आणि रॅली काढण्याची वेळ काय आहे, रॅलीमध्ये किती मुलांना आणायचे आहे, अशी विचारणा दोघांनी केली. त्याचवेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अर्जुनने पिस्तूल काढली आणि मोनू कल्याणे याच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटस्थावरून पळ काढला. मोनू कल्याणे यांना गोळी लागताच ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर कल्याणे यांना मित्रांनी तातडीने रुग्णालयात नेले मात्र काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. आरोपीने जवळच उभ्या असलेल्या मित्रांवरही हवेत गोळी झाडली मात्र मित्र बचावले. या प्रकरणी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.