25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामामध्यप्रदेश; ब्लकमेल करून अत्याचार करणाऱ्या नफीजच्या घरावर बुलडोजर !

मध्यप्रदेश; ब्लकमेल करून अत्याचार करणाऱ्या नफीजच्या घरावर बुलडोजर !

आरोपीला अटक

Google News Follow

Related

मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या घरावर प्रशासनाने कारवाई करत बुलडोजर चालवला आहे. आरोपीने तरुणीला ब्लकमेल करून तब्बल तिच्यावर चारवर्ष अत्याचार केला आणि त्यानंतर तरुणीचे लग्न झाल्यानंतर तरुणीचे अश्लील फोटो व्हॉट्स अपवर स्टेट्स ठेवून व्हायरल केले. पिडीत मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नफीज असे आरोपीचे नाव आहे.

पिडीत मुलीची तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आरोपीच्या अनधिकृत घरावर बुलडोजर चालवून जमीनदोस्त केले. शनिवारी (२४ ऑगस्ट) जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मुलीचे फोटो व्हायरल करण्याचे प्रकरण १० ऑगस्ट रोजीचे आहे, त्यानंतर १३ दिवसांनी आरोपीच्या घरावर कारवाई करत बुलडोजर चालवला.

हे ही वाचा :

चिमुरडी पुन्हा लक्ष्य; कांदिवली समतानगरमध्ये लिंगपिसाट रहीम पठाणला अटक, मानखुर्दमध्येही अत्याचार

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा !

बंद दाराआड ते चार भिंतीआड; एक सडलेला प्रवास…

११ लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे देणार

पिडीत तरुणीने तक्रारीत सांगितले की, माझा भाऊ अमन रघुवंशी याचा मित्र नफीज उर्फ विकी मन्सुरी याने भावाला भेटण्याचे बहाण्याने घरात शिरकाव केला आणि माझे बाथरूम मधील फोटो काढले. यानंतर फोटो व्हायरल करेन अशी धमकी देत माझ्यावर अत्याचार सुरु केले. फोटोची धमकी देत त्याने माझ्यावर चार वर्ष अत्याचार केले.

तक्रारीनुसार पीडित तरुणीने सांगितले की, १२ जुलै २०२४ रोजी माझे लग्न झाले. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी त्याने मला भेटायला बोलाविले, मात्र मी नकार दिला. धर्म बदलून माझ्याशी मग्न कर, नाहीतर तुझे फोटो सोशल मिडीयावर शेअर करेन तसेच तुझ्या भावालाही ठार करेन, अशी आरोपीने धमकी दिल्याचे पिडीत तरुणीने तक्रारीत मांडले. ती पुढे म्हणाली, मी भेटायला नकार दिल्याने आरोपीने माझे फोटो व्हॉट्स अपवर स्टेट्स टाकले.

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध कलम-६४, ३५१-३, ६६-ई, ६२-२, BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या अनधिकृत घरावर बुल्डोजरची कारवाई करण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा