लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोटाच्या मास्टरमाईंडला अटक

लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटामागील मास्टरमाईंड जसविंदर सिंह मुल्तानीला पोलिसांनी अटक केली आहे. जर्मनीत पोलिसांनी प्रतिबंध असलेल्या सिख फॉर जस्टिस (SFJ) संघटनेशी जसविंदर हा संबधित आहे. जसविंदर सिंह हा लुधियाना कोर्टात झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.

या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जसविंदर सिंह हा दिल्ली आणि मुंबईमध्ये देखील दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे. दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये हल्ला करण्याचा कट रचत होता. आता त्याला अटक करण्यात आली आहे.

जसविंदर सिंह मुल्तानी (४५) एसएफजेचे संस्थापक गुरपतवंत सिंह पन्नू यांचा निकटवर्तीय मानला जातो. जसविंदर सिंह याच्यावर फुटीरतावादी घटनांमध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप आहे. जसविंदर सिंह मुल्तानी यानेच शेतकरी नेते बलवीर सिंह राजेवाल यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा कट प्रत्यक्षात येण्यापूर्वीचं उधळून लावला होता.

हे ही वाचा:

दिव्यांग रिक्षाचालकाला आनंद महिंद्रा यांनी दिली ‘ही’ ऑफर

रायगड: महिला सरपंचाचा खून! विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह

अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची कोर्टात धाव

कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयाच्या छतावरून पडून कामगाराचा मृत्यू

लुधियाना कोर्टात २३ डिसेंबरला स्फोट झाला होता. त्या स्फोटात आयईडीचा वापर करण्यात आला होता. आयईडीचा वापर झाल्याने पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला होता. ज्याने हा बॉम्ब न्यायालयात बसविला त्या गगनदीप नावाच्या व्यक्तीचा या स्फोटात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती बडतर्फ पोलिस अधिकारी होती.

Exit mobile version