त्रिपाठी खंडणी प्रकरणाचे लखनऊ कनेक्शन

त्रिपाठी खंडणी प्रकरणाचे लखनऊ कनेक्शन

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सौरभ त्रिपाठी आणि काही अधिकाऱ्यांवर अंगाडिया व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी हे गेल्या काही दिवसांपासून कामावर आलेले नाहीत, त्यामुळे संशय बळावून पोलीस उपयुक्त सौरभ त्रिपाठी यांना फरार आरोपी घोषित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी सौरभ त्रिपाठी यांना शोधण्यासाठी पथके तयार केली होती. या प्रकरणी अधिक माहिती समोर आली आहे.

सौरभ त्रिपाठी यांना मिळणारे खंडणीचे पैसे लखनऊमध्ये स्वीकारणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक लखनऊ येथे गेले असता पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती सौरभ त्रिपाठी यांना मिळणारे खंडणीचे पैसे लखनऊमध्ये स्वीकारत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईतील या खंडणी प्रकरणाचे धागेदोरे लखनऊमध्ये सापडल्याने सौरभ त्रिपाठी यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेण्यासाठीही पोलिसांची पथके तपास करत आहेत.

हे ही वाचा:

मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला, आता अनिल परबने रिसॉर्ट तुटणार

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

कलम ३७० पुन्हा लागू करा…शिवसेनेची मागणी

‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’

२०२१ मधील डिसेंबर महिन्यात अंगाडिया व्यावसायिकांना आयकराची भीती दाखवत पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आले होते. पोलिसांची वागणूक आणि पोलिस ठाण्यातील नोंद यात तफावत आढळ्याचे समोर आल्यानंतर अनेकांवर कारवाई करण्यात आली होती. मुंबई क्राईम ब्रांचकडून खंडणी उकळल्या प्रकरणी अधिक तपास सुरु करण्यात आला. खंडणी उकळल्याच्या प्रकरणामध्ये डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा समावेश असल्याचं समोर आलं. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीत त्रिपाठी यांचं नाव समोर आलं. सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगाडिया असोसिएशनकडून महिना १० लाख खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version