रेल्वे रुळावर सापडला ‘एलपीजी सिलिंडर’

उत्तराखंडमधील घटना

रेल्वे रुळावर सापडला ‘एलपीजी सिलिंडर’

रविवारी (१३ ऑक्टोबर) पहाटे उत्तराखंडमधील रुरकीजवळ रेल्वे रुळांवर रिकामे एलपीजी सिलिंडर सापडल्याने मोठा अनर्थ टळला. मालगाडीच्या लोको पायलटने रेल्वे रुळावर सिलिंडर पाहिल्यानंतर ताबडतोब अधिकाऱ्यांना सूचित केले आणि संभाव्य धोका टाळला!

उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ), हिमांशू उपाध्याय यांनी सांगितले की, धांधेरा पासून अंदाजे एक किलोमीटर अंतरावर लांडौरा आणि धांधेरा स्थानकांदरम्यान सकाळी ६:३५ वाजता ही घटना घडली. एक पॉइंट्समन घटनास्थळी पाठवण्यात आला आणि त्याने सिलिंडर रिकामा असल्याची खात्री केली. त्यानंतर सिलेंडर टाकी धांधेरा येथील स्टेशन मास्तरांच्या ताब्यात आहे. स्थानिक पोलीस आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) यांना सूचित करण्यात आले असून एफआयआर दाखल करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

बाबा सिद्दीकी हत्या, हल्लेखोरांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार, हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या

सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार

बांगलादेशातील मंदिरे, मंडपांवर हल्ल्याचा भारताकडून निषेध!

दरम्यान, रेल्वे रुळावरून घसरण्याच्या कटाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतीय रेल्वेने उघड केले की ऑगस्टपासून देशभरात असे १८ प्रयत्न झाले आहेत. जून २०२३ पासून, २४ घटना घडल्या आहेत, ज्यात एलपीजी सिलिंडर, सायकली, लोखंडी रॉड आणि सिमेंट ब्लॉक यासह विविध वस्तू रुळांवर ठेवण्यात आल्या होत्या.

Exit mobile version