गणेश नाईक यांच्यापासून झालेल्या मुलाला त्यांचे नाव देण्याबाबत विचारले असता नाईक यांनी स्वत:जवळील परवाना असलेली रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारून स्वतःलाही संपवण्याची अशी धमकी दिल्याची तक्रार नाईक यांच्या प्रेयसीने सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
वाशी येथील एका स्पोर्ट क्लब मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या या तरुणीसोबत १९९५ साली आमदार गणेश नाईक यांची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर सीबीडी बेलापूर येथील एका बंगल्यात दोघांच्या संमतीने शारीरिक संबंध जुळून आले होते.
२००४ मध्ये मुलं होऊ देण्याचा निश्चय करून देखील नाईक यांची प्रेयसी २००६ मध्ये गर्भवती राहिली, नाईक यांनी तिला ६ महिन्याची गर्भवती असताना न्यू जर्सी अमेरिका येथे पाठवले. त्या ठिकाणी ती एकटीच राहत होती. त्यानंतर तिने न्यू जर्सी येथील रुग्णालयात मुलाला जन्म दिला.
मुलाच्या जन्मानंतर गणेश नाईक स्वतः अमेरिका येथे आले व त्यांनी प्रेयसी आणि मुलाला घेऊन मुंबईत आले.
नवी मुंबईतील नेरुळ येथे एका आलिशान टॉवर मध्ये तिला घर घेऊन दिले व ती मुलासह तिकडे राहू लागली.अधूनमधून गणेश नाईक तिला भेटण्यासाठी येत होते, तिने मुलाला तुमचे नाव द्या, असे अनेक वेळा सांगितले. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले असे प्रेयसीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अन्सारसह १४ अटकेत
राऊत यांनी १०० कोटींचा आकडा आणला कुठून?
भाजपाने पत्राचाळीतून भ्रष्टाचारविरोधी अभियानाचा बिगुल फुंकला!
२०२४ मध्ये ‘ही’ जागा शंभर टक्के भाजपा जिंकणार!
या महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २०२१ मध्ये आमदार गणेश नाईक यांनी मला व मुलाला सीबीडी बेलापूर येथे त्यांचे ऑफीसमध्ये भेटण्याकरीता बोलावून घेतले. आम्ही एकत्र जेवण केले. मी त्यांना मुलाला त्यांचे नाव देण्याबाबत विचारणा केली. असता त्यांनी मला त्यांचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर दाखवून तू जास्त बोलु नको, तू काय करणार, असे बोलून तुम्ही मला त्रास देवू नका, नाहीतर मी स्वतः ला पण संपवेन व तुम्हाला सुध्दा संपवेन अशी ठार मारण्याची धमकी दिली असेही तिने तक्रारीत म्हटले आहे.
आमदार गणेश नाईक यांनी माझी आणि मुलाची फसवणूक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नाईक यांची प्रेयसीने बेलापूर पोलीस ठाण्यात दिली असून पोलीसानी याप्रकरणी आमदार गणेश नाईक यांच्याविरुद्ध फसवनुक आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.