विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिची गळा चिरून हत्या करणारा हनान शफीक शेख ला विक्रोळी पोलिसानी घटना घडल्याच्या आठ तासात अटक केली आहे.
लग्न करण्यासाठी तगादा लावला म्हणून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे, मात्र यामागे आणखी वेगळे कारण असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुमन सूरज निर्मल (३७) असे हत्या करण्यात आलेल्या हिंदू महिलेचे नाव आहे.सुमन ही विक्रोळी पूर्व मच्छि मार्केट जवळ असणाऱ्या एका चाळीत पती सोबत राहण्यास होती, सुमनचा पती हा महालक्ष्मी येथे सुरक्षा गार्ड म्हणून नोकरीला असून सुमन ही सायन धारावी येथे बॅग बनविण्याचा कारखान्यात नोकरीला होती.
त्याच ठिकाणी काम करणारा हनान शफीक शाह (२५) याने तीला आपल्या प्रेमजाळ्यात अडकवले होते,तीचा पती रात्रपाळीला कामावर गेल्यावर हनान हा तिच्या घरी येत असे.
हे ही वाचा:
मुंबईत दहा कोटींच्या अफगाण चरससह दोघांना अटक
मोदींच्या विमानाला आकाशात सौदीच्या विमानांनी दिली साथ
खोट्या बातम्या थांबवा! – अमित मिश्राचा संतप्त इशारा
संग्राम थोपटेंनी काँग्रेसविरोधात दंड थोपटले, भाजपात केला प्रवेश!
मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुमनचा पती हा कामावरून घरी आला असता,घरात सुमन ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिचे हातपाय बांधण्यात आले होते आणि गळा कापलेला होता.पती सुरज याने आरडाओरडा करून शेजाऱ्याना गोळा केले आणि पोलिसांना कळवले.
विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सुमनचा मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी येथे पाठविण्यात आला होता. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोराची माहिती घेण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले.
दुसरीकडे गुन्हे शाखा कक्ष ७ चे पथक आरोपीचा माग घेत होते, पोलिसानी परिसरातील सीसीटीव्ही, मृत महिला सुमन चे मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासले असता सुमन सोबत काम करणारा हनान शाह संशयित आढळून आला. पोलिसांनी हनान शाह याचा शोध सुरू घेऊन त्याला दुपारी धारावी येथून अटक करण्यात आली आहे. लग्नासाठी सतत तगादा लावत होती म्हणून तिला संपवले अशी कबुली आरोपी हनान याने पोलिसांना दिली. मात्र या हत्येमागे वेगळे कारण असू शकते असा संशय पोलिसांना असून या अनुषंगाने तपास सुरू आहे.