झारखंडनंतर आता दिल्लीत लव्ह जिहादवरून मुलीवर केला गोळीबार

आरोपी अमानत अलीला घेतले पोलिसांनी ताब्यात

झारखंडनंतर आता दिल्लीत लव्ह जिहादवरून मुलीवर केला गोळीबार

पाच दिवसांपूर्वी दिल्लीत लव्ह जिहादचा प्रकार समोर आला आहे. एका शालेय विद्यार्थीनीवर गोळीबार करणाऱ्या अमानत अली या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शाळेतून घरी परतत असताना तिचा नियमित पाठलाग करणाऱ्या अमानत अलीने हे कृत्य केले.

अमानत अलीचे दोन मित्र पवन आणि बॉबी यांनाही गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. २५ ऑगस्टला ही घटना घडली. ही १६ वर्षांची मुलगी शाळेतून घरी परतत होती. नयना मिश्रा असे या मुलीचे नाव आहे. दिल्लीतील संगम विहारमध्ये ती राहते.

अमानत अलीशी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होती. पण गेले ४-५ महिने तिने त्याच्याशी बोलणे सोडले होते. पण अमानत अली तिचा पाठलाग करत होता.

तिने सांगितले की, ती शाळेतून घरी परतत असताना तीन मुलगे मोटरसायकलरून तिचा पाठलाग करत होते. संगम विहारच्या बी ब्लॉकजवळ पोहोचल्यानंतर त्यापैकी एका मुलाने तिच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर हे तिघेही घटनास्थळावरून पळून गेले.

हे ही वाचा:

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

गर्भाशयाच्या कर्करोगावर आता आली लस

‘बिग बी’ने कोरोनाला दुसऱ्यांदा लगावला ठोसा

आजपासून ‘या’ नियमांत होताहेत मोठे बदल

 

या गोळीबारात नयना मिश्राच्या खांद्याला जखम झाली आहे. तिला बात्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अमानत अलीवर खुनाचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अमानत अली १९ वर्षांचा असून उत्तर प्रदेशच्या मिरत जिल्ह्यातील मवाना गावातील आहे. सध्या तो दिल्लीतील संगम विहारमध्ये राहतो. या युवतीशी त्याने सोशल मीडियातून संपर्क साधला होता. पण नंतर तिने त्याच्याशी बोलणे टाळल्यानंतर तो चिडला होता. त्याबदल्यात तिला मारण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यासाठी त्याने बॉबी आणि पवन या अन्य आरोपींची मदत घेतली.

Exit mobile version