मध्य प्रदेशमधील सुजालपूर जिल्ह्यात लव्ह जिहादचा प्रकार उघडकीस आला असून रचना नावाच्या मुलीला सक्तीने मुस्लिम बनविण्यात आल्यानंतर दोन मुलांची आई असलेली रचना ही शनिवार ४ जूनला मृत्युमुखी पडली. तिच्या या मृत्युमुळे खळबळ उडाली आहे.
रचना या मुलीने आपल्या आईवडिलांच्या विरोधात जाऊन इरफान नावाच्या मुलाशी लग्न केले. रचनाचे सक्तीने धर्मांतर करण्यात आले होते. तिचा पती इरफान हा तिला मारहाण करत असे. त्यातच तिचे शनिवारी निधन झाले. याआधी तिने २०२१मध्येही आपल्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली होती.
Shujalpur, MP: Rachna became Alia to marry Irfan against her parents wish, died yesterday. She is a mother of 2, lived in Susner with him. In 2021 she registered a complaint against Irfan, he was forcing her to convert. She was a victim of domestic violence too. Her father: pic.twitter.com/kOj0UccoFs
— Subhi Vishwakarma (@subhi_karma) June 5, 2022
तिच्या मृत्यूसंदर्भात तिच्या वडिलांनी एका व्हीडिओमध्ये कहाणी सांगितली आहे. ते म्हणतात की, इरफानने तिला लव्ह जिहादच्या बहाण्याने फसविले आणि तिच्याशी लग्न केले. चार पाच वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्यांना दोन मुले होती. घरात तिला मारहाण करत असत त्यामुळे ती माहेरी आली होती. पण तिला तिचा नवरा आणि सासरे पुन्हा घरी घेऊन गेले. तिच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. घरी घेऊन गेल्यावर इरफानचा फोन आला की, ती मृत झाली आहे. तिच्यावर आम्ही हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करणार आहोत.
हे ही वाचा:
‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’
वादग्रस्त क्रीडा अधिकारी नावंदेना सरकार का पाठिशी घालते आहे?
पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य मुदतीआधीच गाठले
देवेंद्र फडणवीसांना पुन्हा कोरोनाची लागण
या मुलीने २०२१मध्ये इरफानविरोधात सुसनेर येथे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. तीन वर्षांपूर्वी इरफानने मला प्रेमाच्या जाळ्यात फसवून विवाह केला. मला त्याने मुस्लिम बनविण्यासाठी दबाव आणला. फेब्रुवारी २०२१ मध्ये सुजालपूर येथे निकाह करून त्याने माझे नाव अलिया ठेवले. मी मुस्लिम धर्माप्रमाणे रितीरिवाजांचे पालन करावे म्हणून माझ्यावर वारंवार दबाव आणला गेला. पण मी त्याला नकार दिल्यावर मला मारहाण करण्यात आली. त्यात माझ्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. मला त्यामुळे चालता फिरताही येत नव्हते. १९ ऑगस्टला मी संधी साधून माझा मुलगा रेहानला घेऊन माहेरी आले. आईवडिलांना झालेली घटना सांगितली. त्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला आलो आहोत आणि त्याच्यावर कारवाई व्हावी अशी तक्रार करत आहोत.
सदर मुलीने तेव्हा ही तक्रार केली होती, पण आता ती मृत्युमुखी पडली आहे.