उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात एका विवाहित महिलेवर बलात्कार आणि जबरदस्तीने तिचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका पुरुषाला आणि इतर दोघांना अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुख्य आरोपीने आपण हिंदू असल्याचे भासवून महिलेला फसवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.
आरिफ खान असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिला अभय मिश्रा असे नाव असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर त्यांच्यात संवाद वाढला आणि नंतर ते एकमेकांच्या जवळ आले. २४ मार्च रोजी ही महिला मिर्झापूर येथील तिच्या माहेरी गेली असता, आरिफही तेथे आला. त्यानंतर, तो तिला अंबाला येथे घेऊन गेला. अंबाला येथे पोहोचल्यावर, महिलेला आरिफ खानची खरी ओळख पटली, परिणामी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरिफ खानने महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध २५ दिवस डांबून ठेवले, यादरम्यान त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा:
तिसऱ्या प्रयत्नात आयएएस होण्याचे काश्मिराचे स्वप्न झाले पूर्ण
आदित्य ठाकरेंना लोकशाही का दिसत नाही?
लोकसभेच्या जागावाटपातही सूडाचा निकष…
ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बानीस म्हणाले, मोदी म्हणजे ‘द बॉस’
त्याने या कृत्याचे चित्रीकरणही केले आणि महिलेला ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओ फुटेजचा वापर केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने महिलेला नमाज अदा करण्यास, बुरखा घालण्यास आणि तिला बंदिवासात असताना ईद साजरी करण्यास भाग पाडले. पळून जाण्यात यशस्वी झालेल्या पीडितेने मिर्झापूर पोलिस ठाण्यात आरिफ खानविरोधात तक्रार केल्यावर ही घटना उघडकीस आली. आरिफ खान सोबतच त्याचा भाऊ इमरोज खान आणि मित्र शहाबुद्दीन यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण म्हटले आहे. सुरुवातीला आरिफ खानच्या कैदेतून सुटण्यात यश मिळवल्यानंतर ती महिला मिझरापूरला पोहोचली. आरिफने तिच्या पतीला तिचे अश्लील व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्यानंतर महिला आणि तिच्या पतीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस अधीक्षक संतोष मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असून पोलिस या प्रकरणाचा सक्रियपणे तपास करत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.