कर्नाटकमध्ये एकतर्फी प्रेमातून एका २४ वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरमेठ यांची मुलगी नेहा हिची हत्या फय्याझ या तिच्या कॉलेजातील तरुणानेच केल्याची ही भयंकर घटना आहे. श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणेच हेदेखील लव्ह जिहादचे प्रकरण आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्हीत हे स्पष्ट झाले आहे की, बी. व्ही. भूमारेड्डी इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञान कॉलेजमध्ये ही हत्या झाली. नेहा ही एमसीएच्या पहिल्या वर्षाला होती तर फय्याझ हा बीसीएच्या पहिल्या वर्षाला होता. फय्याझ त्या दिवशी तिची प्रतीक्षा करत होता. ती कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर त्याचे तिच्याशी भांडण झाले. त्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. ती पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिला पकडले आणि तिच्या मानेवर अनेकवेळा चाकूने वार केले. त्याठिकाणी अनेक विद्यार्थी धावले तेव्हा फय्याझने पळून जाण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
इराणने जप्त केलेल्या इस्रायली जहाजावरील भारतीय डेक कॅडेट सुखरूप परतली मायदेशी
पक्षांना निधी पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीय निधीचा पर्याय
भगवी वस्त्रे परिधान केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा
लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!
त्यानंतर नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले पण गंभीर जखमी अवस्थेतच तिचा मृत्यू झाला. फय्याझ हा तिला सातत्याने मागणी घालत होता. तिने त्याला नकारही दिला. तिने दिलेल्या नकारामुळे संतापून त्याने हे कृत्य केले. आपल्याला नकार देणाऱ्या मुलीला आपण मारून टाकू असे त्याने मित्रांना सांगितल्याचेही समोर आले आहे. मात्र हे जर आधीच पोलिसांपर्यंत पोहोचले असते तर ही घटना कदाचित घडली नसती.
पोलिसांनी नंतर फय्याझला अटक केली आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, तो नेहाला मारून टाकण्याच्या इराद्यानेच आला होता. त्याने मानेवर वार केले याचा अर्थ तो तिला ठार करण्याच्या हेतूनेच आला होता. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या कॉलेजच्या बाहेर निदर्शने करत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.