27 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाआठ वर्षांनंतर उलगडला ‘लव्ह जिहाद’चा कारनामा; पती हिंदू नसल्याचा पर्दाफाश

आठ वर्षांनंतर उलगडला ‘लव्ह जिहाद’चा कारनामा; पती हिंदू नसल्याचा पर्दाफाश

महिलेने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली

Google News Follow

Related

हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे धर्मांतर करण्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. तरीही ही प्रकरणे संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. नुकतीच दिल्लीनजीक गाजियाबादमध्येही अशीच घटना समोर आली आहे. पीडित महिलेला लग्न होऊन आठ वर्षे झाली तरी तिचा पती हिंदू नाही, हे माहीत नव्हते. जेव्हा तिला हे समजले, तेव्हा त्याने तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

 

महिलेला दोन मुले असूनही तिने धर्मांतरणाला विरोध केला आहे. सासरच्यांनी खूप दबाव आणल्याने तिने हे घर सोडले असून ती अन्य ठिकाणी राहायला गेली आहे. मात्र तिचा पती त्याची आई आणि भावासोबत तिथे राहायला आला आणि तिला मारहाण केली. यानंतर महिलेने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. लगेचच सक्रिय झालेल्या पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी तिच्या पतीला अटक केली. आरोपी पतीचे नाव रिकी उर्फ नावेद असून पत्नीचे नाव अर्चना आहे. दोघांचा विवाह सन २०१५मध्ये झाला होता. या दरम्यान ते आठ वर्षं एकत्र राहात होते. त्यांना दोन मुलेही आहेत.

हे ही वाचा:

वित्त आयोगाकडून मंजूर निधी प्राप्त करण्यासाठी कार्यवाही करावी

मोसाद निघणार हमास दहशतवाद्यांच्या शोधात!

‘भारत-कॅनडामधील संबंध सुधारू लागले’!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!

आरोपीची ओळख लग्नाच्या काही महिन्यांपूर्वी झाली होती. त्याने त्याचे नाव रिकी सांगितले होते. दोघांमध्ये प्रेम जुळले आणि दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाला होकार दिल्यावर त्यांचे लग्न झाले. त्यानंतर दोघे दिल्लीच्या वजिराबादमध्ये राहू लागेल. या दरम्यान पाच वर्षांत त्यांना दोन मुलेही झाली. त्याच दरम्यान पती रिकीचे रहस्य समजल्यावर अर्चनाला धक्का बसला. रिकी मुस्लिम असून त्याचे खरे नाव नावेद आहे. तिने सुरुवातीला विरोध केला, मात्र मुलांसाठी ती गप्प बसली. मात्र नावेदने तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मौलवीकडे जाऊन जबरदस्तीने धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने याला विरोध केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा