लव्ह जिहादची शिकार बनलेल्या सौम्या या २५ वर्षीय इंजिनीअर विद्यार्थिनीने चेन्नईच्या रामनाथपुरम जिल्ह्यात आत्महत्या केली आहे. चार पानी सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करत विद्यार्थिनीने तिचा प्रियकर शेख मोहम्मद आणि त्याच्या कुटुंबीयांवर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्या ही एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. त्यादरम्यान, मोहम्मद शेख नावाच्या व्यक्तीने तिला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेमात पडल्यानंतर विद्यार्थिनीने तिच्या पालकांच्या विरोधाला न जुमानता मोहम्मदसोबत बाहेरगावी जायला सुरुवात केली. काही काळाने तिची प्रेमात फसवणूक झाली. त्यांनतर पीडित तरुणीने १४ डिसेंबर रोजी आत्महत्या केली.
सौम्याने सुसाईड नोटही लिहिली आहे. या चिठ्ठीत तिने मोहम्मदवर आरोप केला आहे. चिठ्ठीनुसार, शेखने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तो पळून गेला. तिरुचिरापल्लीला पळून जाण्यापूर्वी शेखने तिच्याकडून लाखो रुपये आणि एक महागडा मोबाइल घेतल्याचा आरोपही विद्यार्थिनीने केला आहे. शेख याच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र त्याने पीडितेचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला असल्याचे तिने लिहिले आहे.
हे ही वाचा:
सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा
मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील ३८ इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना!
राज्यातील निवडणूका पुढे ढकलणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव
ठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी
सुसाईड नोटमध्ये पीडितेने, मोहम्मद शेखच्या वडिल व त्याच्या काकाविरुद्ध लैंगिक शोषण, बलात्कार, मानसिक शोषण आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.