24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामापुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट...

पुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट…

प्रेयसी आणि नातेवाईकांनी केली हत्या

Google News Follow

Related

बिहारमधील गोपालगंज येथे गेल्या आठवड्यात झालेल्या शिवमंदिराचे पुजारी मनोज साह यांच्या हत्येचे प्रकरण पोलिसांनी उघड केले आहे.या हत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचे उघड झाले आहे.पुजारी मनोज साह एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता.पुजाऱ्याने आपल्या मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ बनविला होता.यामुळे तरुणी अस्वस्थ झाली होती.मुलीने पुजारी मनोज साहला तिच्या माहेरच्या घरी बोलावले आणि तिचा भाऊ आणि मावशी सोबत मिळून त्याची हत्या केली.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या कुटुंबातील तिघांना अटक केली आहे.

हे प्रकरण बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील दानापूर गावातील आहे.दानापूर गावातील शिव मंदिराचा पुजारी मनोज कुमार साह हा अचानक बेपत्ता झाला होता.त्यांनतर काही दिवसानंतर पोलिसांना मनोज साह याचा मृतदेह गावातील झुडपात आढळून आला होता.मृतदेह सापडला तेव्हा पुजाऱ्याचे डोळे बाहेर काढण्यात आले होते आणि गुप्तांगही कापण्यात आले होते. त्यांनतर स्थानिकांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली आणि महामार्गावर उभ्या असलेल्या पोलिसांच्या वाहनाला आग लावली.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता.मात्र, हे प्रेमप्रकरण असल्याचे आता उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजारी मनोजने प्रेयसीचा अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने त्याचा खून करण्यात आला.याप्रकरणी एसआयटीने चार जणांना अटक केली आहे.पोलिसांनी हत्येत वापरण्यात आलेला चाकू, दोरी, स्कार्फ, रक्ताने माखलेली सलवार, पुजाऱ्याचा फोन आणि आरोपीने हत्येत वापरलेले अन्य दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

हे ही वाचा:

पंजाबचा गँगस्टर अमृतपाल सिंगला पोलिसांनी घातल्या गोळ्या, दोन पोलीस जखमी!

संतापजनक! मुंबईत ६४ वर्षीय महिलेवर बलात्कार; आरोपीला ठोकल्या बेड्या

दहशतवादी पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदींचे महत्त्वाचे विधान!

सर्वज्ञानी सुषमा अंधारेंनी ‘त्या’ प्रकरणी दिलगिरीचे पत्र द्यावे, अन्यथा…

सारण क्षेत्राचे डीआयजी विकास कुमार यांनी सोमवारी सांगितले की, मनोज साहची प्रेयसी आणि तिच्या मामाच्या कुटुंबीयाने त्याची हत्या केली.अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव नेहा असून तिने मनोज साह याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे तिच्या जबाबात सांगितले आहे.यावर्षी मार्चमध्ये नेहाचे दुसऱ्या मुलाशी लग्न झाले.लग्नापूर्वीचे अश्लील व्हिडिओ त्याच्याकडे असल्याने मनोज मला ब्लॅकमेल करत होता, असे आरोपी नेहाने सांगितले.नेहाने याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. यांनतर कुटुंबीयांनी पुजाऱ्याचा काटा काढण्याचे ठरवले.

आरोपी नेहाने पोलिसात जबाब दिल्यानुसार, १२ डिसेंबर रोजी रात्री सव्वा एकच्या सुमारास आरोपी नेहाने तिच्या मावशीच्या मोबाईलवरून मनोज याला कॉल करून तिच्या माहेरच्या घरी बोलाविले.यानंतर मनोज घरी आल्यानंतर त्याला पकडून तीन दिवस घरात डांबून ठेवले.१५ डिसेंबर रोजी रात्री मनोजचे तोंड स्कार्फने बंद केले आणि नंतर चाकूने त्याच्यावर वार करून त्याला ठार केले.यानंतर सर्वांनी मिळून त्याची जीभ कापली आणि डोळे बाहेर काढले.यानंतर मनोजचा मृतदेह सुधा डेअरीजवळील झुडपात फेकून दिल्याचे नेहाने सांगितले.

ती पुढे म्हणाली, लग्नापूर्वी मनोजने तिचे अश्लील व्हिडिओ बनविले होते.लग्नानंतरही तो वारंवार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी अवैध संबंध ठेवत होता.त्यामुळे वैतागून मनोजची हत्या केल्याचे नेहाने सांगितले.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दानापूर गावातील आरोपी नेहा कुमारी, तिची मावशी देवी आणि अमित कुमार याला पोलीस चौकशीनंतर न्यायालयीन कोठाडी सुनावण्यात आली.या घटनेतील अन्य आरोपींचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा