झोमॅटोचे टी-शर्ट घालून लुटली बँकेंची रोकड

डिलीवरी बॉयने बँकेच्या कर्मचाऱ्यांना लुटले

झोमॅटोचे टी-शर्ट घालून लुटली बँकेंची रोकड

झोमॅटोचे टी-शर्ट घालून चेहरा हेल्मेटने झाकून बँकेची रोकड लुटणाऱ्या दरोडेखोरापैकी तिघांना भिवंडी शहर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघाजवळून लुटलेल्या रकमेपैकी ८ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहर या ठिकाणी असलेल्या बेसिन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह बँकेची ११.७५ लाख रुपयांची रोकड राष्ट्रीयकृत बँकेत जमा करण्यासाठी घेऊन निघालेल्या कर्मचारी यांना झोमॅटोचे टी-शर्ट आणि हॅम्लेट घालून मोटारसायकल वरून आलेल्या दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचारी यांची मोटरसायकलला धडक देऊन खाली पाडली, त्यानंतर एका कर्मचाऱ्यांच्या हातातील पावणे बारा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग खेचून पोबारा केला. ऑक्टोबर महिन्यात ही घटना भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.

हे ही वाचा:

मुंबई-बर्मिंगहॅम विमानसेवा हवीय!

भारताचा पराभव; आठवण आली धोनीची

सर्वाधिक रुंदीचा मिसिंग लिंक बोगदा तयार होतोय

जॅकलिनवरची टांगती तलवार कायम

भिवंडी शहर पोलीसानी तात्काळ गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला. हे दरोडेखोरांनी झोमॅटोचे टि-शर्ट हेल्मेट परिधान केल्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. तपास पथकाने दरोडेखोराच्या मोटरसायकलचा नंबर मिळवून शोध घेतला असता मोहम्मद इलियास मन्सूरी याला नारपोली तर अब्दुल शाहिद अब्दुल वफा चौधरीला भिवंडीतील कण्हेरी आणि सैफअली मोहम्मद मुस्तफा खान याला समदनगर भिवंडी येथून अटक करून त्यांच्या जवळून ८ लाख रुपयांची रोकड आणि गुन्हयात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन काकडे आणि पथकाने केली.

Exit mobile version