लोकसत्ताचे पत्रकार राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या

लोकसत्ताचे पत्रकार राजेंद्र येवलेकर यांची आत्महत्या

लोकसत्ताचे मुख्य उपसंपादक राजेंद्र येवलेकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे वृत्त आल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली. राजेंद्र हे ५३ वर्षांचे होते. त्यांनी घरातच गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या या अकाली मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत असतानाच आत्महत्येमागील नेमके कारण काय याविषयीही चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

पुणे शहरातील ते एक ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार होते. नाशिकहून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. त्यानंतर मागील दोन दशके ते पुण्यातून पत्रकारिता करत होते. २६ वर्षे ते पत्रकार म्हणून काम पाहात होते. लोकसत्ता वर्तमानपत्राच्या संपादकीय विभागात त्यांनी अनेक वर्षे संपादनाचे काम केले. पत्रकारितेबरोबरच अध्यापनाचे कामही ते करत असत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये ते अध्यापन करत. त्याव्यतिरिक्त इतर महाविद्यालयातही पत्रकारिता विषय ते शिकवत असत. विज्ञान-तंत्रज्ञान या विषयांवरही ते लिहित असत.

 

हे ही वाचा:

‘महाविकास आघाडी सरकारविरोधात रस्त्यावर उतरून एल्गार पुकारावाच लागेल’

ऐतिहासिक निर्णय! समलैंगिक सौरभ कृपाल न्यायाधीशपदी

मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळला; सिद्दीकींचे जगतापांविरोधात पत्र

…तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही

 

त्यांनी नेमके आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली असेल हे समजू शकलेले नाही. पण मंगळवारी रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे पत्रकारिता क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. ते मनमिळावू आणि साधेसरळ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. कोरोनाच्या काळात अनेक पत्रकारांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या. अनेकांवर आर्थिक संकटे कोसळली. अशा परिस्थितीत येवलेकर यांच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण आहे, हे आता तपासातच उघड होऊ शकेल.

Exit mobile version