श्रीरामपूर, अहमदनगर येथे लव्ह जिहादची गंभीर घटना घडली असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असून एफआयआरमध्ये संशयित आरोपीचे नावदेखील नाही. संताप व्यक्त करण्यासाठी लोकांनी काढलेल्या मोर्चालाही पोलिसांनी परवानगी नाकारली. याप्रकरणी राजकीय दबाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बेलापूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत आपल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला सिकंदर शेख नावाच्या मुलाने फूस लावून पळविल्याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. हे कुटुंब भटक्या विमुक्त समाजातील असून विळे, खुरपे विकण्याचा या कुटुंबाचा व्यवसाय आहे. पळवून नेलेल्या मुलीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले होते. चार मुली व एक मुलगा असा या महिलेचा परिवार आहे.
तक्रार करणाऱ्या या दुर्दैवी महिलेने म्हटले आहे की, विळे, खुरपे विकण्यासाठी मी बाहेर गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर आपली मुलगी घरात नसल्याचे लक्षात आल्यावर शोधाशोध सुरू केली. बराच वेळ ही मुलगी न सापडल्यामुळे तिच्याबरोबर काही अघटित घडले असावे, असा संशय आला. संशयित सिकंदर शेख याच्यासोबत ती मुलगी दिसल्याचे आजूबाजूच्या लोकांनी सांगितले. त्यानंतर काय झाले असावे याचा अंदाज बांधून आम्ही पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. परंतु, तिथे स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या तरुणांची गर्दी एकवटली, तेव्हा पोलिसांनी एफआयआर दाखल केला. परंतु, वारंवार सांगूनही त्या एफआयआरमध्ये सिकंदरचे नाव वगळण्यात आले. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पोलिस ठाण्यासमोर मोठा जमाव एकत्र झाला. लोक मोर्चा काढण्याच्या तयारीत होते. परंतु पोलिसांनी मोर्चा काढायला परवानगी नाकारली.
हे ही वाचा:
रेल्वेशी चर्चा न करताच ठाकरे सरकारची घोषणा
…तसं तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही स्टेजवर तलवार घेऊन पाहिलंय
तरीही एजन्सीने पुरवला गळका सिलिंडर
बांगलादेशात मंदिरे आणि मूर्त्यांचा विध्वंस; तस्लिमांकडून तीव्र निषेध
श्रीरामपूरमध्ये अल्पसंख्य समुदायाचा टक्का मोठा असून तिथे अनेकदा तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत असतात. लव्हजिहादच्या या ताज्या घटनेमुळे या भागात संतापाची लाट उसळली आहे. हा प्रकार एका व्यापक षडयंत्राचा भाग असल्याची माहिती स्थानिक संघटनांच्या नेत्यांकडून समजते.
हिंदू मुलींना योजनाबद्धरित्या लक्ष्य करून त्यांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार इथे वाढले असून काही नेत्यांचा याला आशीर्वाद असल्याचे समजते. एप्रिल २०२१ मध्ये श्रीरामपूर शहरात असा प्रकार घडला होता. डावखर वस्ती परिसरात अतिक शेख याने नगर तालुक्यातील एका हिंदू मराठा समाजाच्या मुलीला पळवून आणले होते. ती मुलगी अतिक शेख सोबत डावखर वस्ती येथे आहे. शिव प्रहार प्रतिष्ठानने हा प्रकार हाणून पाडला. अशा घटना सातत्याने वाढत असल्यामुळे यामागे नियोजित षडयंत्र असल्याचे उघड होत आहे.