आंबिवलीच्या इराणी वाडीत मुंबई पोलिसांवर दगडकाठ्यांनी हल्ला, ५ अटकेत

गुन्हेगाराला सोडण्यासाठी केला हल्ला

आंबिवलीच्या इराणी वाडीत मुंबई पोलिसांवर दगडकाठ्यांनी हल्ला, ५ अटकेत

आंबिवलीच्या इराणी वाडीत सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलीस दलातील पोलिसांवर स्थानिक इराणी महिला आणि पुरुष अशा ३० ते ४० जणांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली, हल्लेखोरांनी दगड काठ्या आणि घातक शस्त्रानी हा हल्ला केला करून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सराईत गुन्हेगाराला पळवून लावले आहे. या हल्ल्यात आंबिवली रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली असून मुंबई एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यासह ४ जण जखमी झाले आहे. या पूर्वी देखील अनेक वेळा आंबिवलीत मुंबई पोलिसांवर हल्ले करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहे. या हल्ल्याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलव असून ५ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ माजवणाऱ्या आंबिवलीतील मुंबई पोलिसांवरील हल्ल्यानंतर स्थानिक पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुंबईतील अंधेरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार ओनु लाला इराणी (२०) हा आंबिवली इराणी वाडी येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बुधवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक ओनु लाला इराणी याला अटक करण्यासाठी आंबिवलीच्या ईराणी वाडीत गेले होते, पोलिसांनी ओनू याला ताब्यात घेऊन पोलीस वाहनांच्या ताफ्याकडे निघाले असताना ओनु लाला इराणीच्या नातेवाईकांनी संपूर्ण इराणी वस्तीत गोंधळ घालून पोलिसांना विरोध करू लागले, काही वेळातच इराणी वस्तीतून ३० ते ४० महिला पुरुष, तरुणांचा जमाव एकत्र आला, व त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.

हे ही वाचा:

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

ठाकरेंचा कडेलोट नेमका कोणामुळे झाला…

फडणवीसांना गादीसाठी नाहीतर लोकांच्या सेवेसाठी पुन्हा यायचे होते!

‘काम नीट न केल्यास बुलडोझरखाली टाकू’

एमआयडीसी पोलिसांनी या जमावातून स्वतःचा आणि आरोपीचा बचाव करण्यासाठी आंबिवली रेल्वे स्थानकात शिरले, हा जमाव पोलिसांच्या पाठोपाठ आंबिवली रेल्वे स्थानकात शिरला आणि पोलिसांवर दगडफेक सुरू केली, पोलिसांनी रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलीसांच्या चौकीत गेले व त्यांनी दार बंद करण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाने दगडफेक सुरूच ठेवून रेल्वे स्था काचे नुकसान करून पोलीस चौकीचे दार तोडून ओनु लाला इराणी ला पोलिसांच्या तावडीतून सोडवून पळवून लावले.या दगडफेकीत एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या पथकातील अधिकाऱ्यासह चार जण जखमी झा1ले.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस आणि खडकपाडा पोलिसांनी आंबिवली कडे धाव घेऊन दगडफेक करणाऱ्या जमावाची धरपकड करून पाच जणांना ताब्यात घेतले.दरम्यान खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जनासह २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे.

Exit mobile version