पुण्यातल्या दहशतवाद्यांच्या कारमध्ये सापडली होती जिवंत काडतुसं

कार मालकाची चौकशी सुरू

पुण्यातल्या दहशतवाद्यांच्या कारमध्ये सापडली होती जिवंत काडतुसं

पुण्यातून अटक केलेल्या दहशतवादी प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी ज्या गाडीचा वापर केला त्या गाडी मालकाची देखील एटीएसकडून चौकशी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातून अटक करण्यात आलेले मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांनी मुंबईतून पळून आल्यानंतर पुण्यात गाडी खरेदी केली होती. ज्या व्यक्तीकडून ही गाडी घेण्यात आली होती त्या व्यक्तीची चौकशी करण्यास आता एटीएसने सुरुवात केली आहे.

मोहम्मद इमरान खान आणि मोहम्मद युनूस साकी या दोघांना पुण्यातील कोथरुड परिसरात पोलिसांनी गाड्यांची चोरी करताना पकडले होते. त्यानंतर हे दोघेही दहशतवादी असल्याचे समोर आले. त्यानंतर दोघांच्या घरात झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडील याच कारमध्ये एटीएसला दोन पिस्तुल आणि पाच जीवंत काडतुसं सापडली होती. पुढे घरात अधिक तपास केला असता त्यांच्याकडे स्फोटकं, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया लिहिलेली चिठ्ठी सापडली होती.

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) जाण्याची शक्यता आहे. पकडलेल्या आरोपींनी त्यांच्या साथीदारांकरता बॉम्ब बनवण्याचं शिबीर आयोजित केलं होतं. शिवाय जंगलात ते सराव देखील करत असल्याचे समोर आले होते. महाराष्ट्र एटीएसने आतापर्यंत या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली आहे.

हे ही वाचा:

ऑस्कर विजेता माहितीपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’मधील कलाकारांचे पैसे बुडवले?

ठाकरेंच्या ‘मातोश्री’ बंगल्यात आढळला विषारी कोब्रा!

‘आम्ही आमच्या दाव्याच्या समीप’

राममंदिरासाठी बनवले विक्रमी ४०० किलो वजनाचे कुलूप

प्रकरण काय?

 पुणे पोलिसांनी १८ जुलै रोजी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय २४) या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. मध्यप्रदेशच्या रतलाममधील मूळ रहिवासी असलेले हे दोघे जयपूर बॉम्बस्फोट कटातील फरार आरोपी आहेत. ‘एटीएस’ने यापूर्वी या दहशतवाद्यांच्या कोंढव्यातील घरातून ड्रोन, संवेदनशील स्थळांची छायाचित्रे आणि लॅपटॉमधून पाचशे जीबी डेटा हस्तगत केला होता. त्यानंतर ‘एटीएस’ने तपासादरम्यान दोन दहशतवाद्यांकडून बॉम्ब तयार करण्याचे रसायन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त केली आहेत. शिवाय त्यांच्या घराच्या पंख्यामध्ये बॉम्ब कसा बनवायचा याची चिठ्ठी सापडली.

Exit mobile version