रॅम्प वॉक करताना लोखंडी खांब कोसळला; २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

एक तरुणही जबर जखमी झाला, चौकशी सुरू

रॅम्प वॉक करताना लोखंडी खांब कोसळला; २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

नोएडाच्या फिल्मसिटीमध्ये असलेल्या एका स्टुडिओमध्ये फॅशन शोदरम्यान रॅम्पवर चालत असताना लोखंडी खांब अंगावर पडल्याने एका २४ वर्षीय मॉडेलचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जबर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंशिका चोप्रा असे मृत व्यक्तीचे नाव आहे आणि बॉबी राज असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हे दोघेही फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. फॅशन शो सुरू असताना रविवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.
पोलिसांनी शोचे आयोजक आणि लोखंडी खांब बसवणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही पीडितांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली.

हे ही वाचा:

राज ठाकरेंचे आवाहन; वाढदिवशी मला ही भेट द्या!

बृजभूषण सिंह म्हणतात, २०२४ची निवडणूक लढवणार, लढवणार, लढवणारच!

‘आदिपुरुष’ची ऍडव्हान्स बुकिंगमध्ये बाजी, ३६ हजाराहून अधिक तिकिटे विकली गेली

‘संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’

फिल्मसिटीच्या स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या फॅशन शो दरम्यान लोखंडी खांब अंगावर पडून वंशिका चोप्रा या मॉडेलचा मृत्यू झाला, अशी माहिती नोएडाचे अतिरिक्त उपायुक्त पोलिस (एडीसीपी) शक्ती अवस्थी यांनी दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कारवाई सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

या मॉडेलचा मित्र बॉबी हादेखील यात जखमी झाला. त्याच्या डोक्याला मार बसला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जवळपास दुपारी १.३० वाजता या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा अपघात घडला. लाइट्ससाठी उभारण्यात आलेले हे खांब कोसळले. पोलिसांनी फॅशन शोच्या आयोजकांना अटक केली आहे आणि लाईटसच्या संदर्भात काम पाहणाऱ्या चार जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version