विक्रोळी येथे पार्किंग लिफ्ट कोसळून एका मजुराचा मृत्यू

निवासी इमारत असल्यामुळे धोका होता पण सुदैवाने आणखी दुर्घटना टळली

विक्रोळी येथे पार्किंग लिफ्ट कोसळून एका मजुराचा मृत्यू

बांधकाम साईडवर पार्किंग लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत १९ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी विक्रोळी पश्चिम येथे घडली. याप्रकरणी पार्कसाइड पोलिसांनी तीन जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

विक्रोळी पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ सौर जगत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीमार्फत सिद्धिविनायक को.ऑ.हौ.सो. हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात आलेला आहे. २०२० मध्ये झोपडीधारकांना प्रकल्प पूर्ण करून त्यांना सदनिका देण्यात आलेल्या आहेत. या इमारतीच्या शेजारी विक्रीकरिता बांधण्यात येणाऱ्या २४ मजली इमारतीचे काम सुरु आहे. बुधवारी दुपारी इमारतीच्या पोडियम पार्किंग लिफ्ट बसविण्याचे काम सुरु असताना लिफ्ट कोसळून शिवम जयस्वाल या वीस वर्षे कामगाराचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

‘सामना’च्या जाहिरातीतून केसरकरांचे आदित्यना निमंत्रण

फरफटत नेलेल्या तरुणीबाबत मैत्रिणीने केले विचित्र विधान, चौकशी होणार

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची संपत्ती जप्त

‘संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ का म्हणू नये’ याचे उत्तरच अजित पवारांनी दिले नाही

दुर्घटना घडली त्यावेळी या लिफ्ट मध्ये चार कामगार होते. ज्यामधील तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, धक्कादायक म्हणजे या ठिकाणी हायड्रोलिक पार्किंगची काम सुरू असताना या इमारतीत तीनशे कुटुंब वास्तव्यास होती, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली . याप्रकरणी पार्क साईड पोलीसानी प्रकल्प प्रमुख अमित कुमटे, आईस्टोन पार्किंग कंपनी चे सुनील तिवारी, गायत्री ऍल्युमिनियम कंपनीचे राकेश उर्फ उमेश सिंग व इतर यांचे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version