मुंबई पोलीस दलातील मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर घाणेरडेआरोप लावून त्यांची बदनामी करणाऱ्या व्हायरल पत्र तयार करणाऱ्याचा शोध लागला आहे. हेपरिवहन विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्यानेच लिहून ते वरिष्ठ अधिकारी आणि गृहमंत्री यांनापाठवले होते असे गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. मोटार परिवहन विभागातील अंतर्गतवादातून हा पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिला कॉन्स्टेबलच्या सह्यांचे हे पत्रजानेवारी महिन्यात मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.या पत्रात मोटारपरिवहन विभागाच्या दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यावर कथित घाणेरडे आरोप लावून त्यांचीबदनामी करण्यात आली होती.या पत्रामुळे संपूर्ण मुंबई पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. पोलीस आयुक्त आणि विशेष पोलीस आयुक्त यांनी या व्हायरल पत्राची दखल घेऊन गुन्हे शाखेलाया प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते.
तपासात सहभागी असलेल्या एका सूत्रानुसार, गुन्हे शाखेने १० पेक्षा अधिक व्यक्तींचे तसेच पत्रातनमूद केलेले हवालदार आणि विभागात काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले. “युनिटमध्येअशा कोणत्याही वर्तनाबद्दल कोणीही आरोप केले नाहीत,” एका सूत्राने सांगितले. हे पत्र कोणी पोस्टकेले याविषयी, एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासाचा एक भाग म्हणून, पोलिसांना आढळले कीयुनिटमध्ये तैनात असलेला एका पोलीस हवालदार जो गेल्या काही आठवड्यांपासून फरार होता. त्यानेच हे पत्र पाठवण्यास तोच जबाबदार होता, असे तपासात निष्पन्न झाले.
हे ही वाचा:
हायवेवर ट्रॅक्टर-ट्रॉली नेता येणार नाही, हायकोर्टाचा शेतकऱ्यांना सल्ला!
चंदीगडमध्ये ‘आप’चा महापौर, आठ मते ठरवली वैध
कॉंग्रेसच्या अल्पसख्यांक विभागाला सर्वाधिक देणगी
हिंदू नावाने राहणारे मुस्लिम बांगलादेशी दाम्पत्य अटकेत
मुंबई पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभागातील आठ महिला कॉन्स्टेबलनी पोलिस उपायुक्त, दोनपोलीस निरीक्षक आणि तीन पुरुष कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचे या पत्रातनमूद करण्यात आले आहे. हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त आणि मुंबईतील सहपोलीस आयुक्त यांना पोस्टाने पाठवण्यात आल्याची प्रत समाज माध्यमावर तसेच पोलीस दलातजानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
व्हायरल कथित पत्राची आम्ही सखोल माहिती घेतली असता त्यातील कथीत अर्जदारांकडे चौकशीकरण्यात आली,सदरचा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व बोगस सहीचा वापर करून कोणीतरीखोडसाळपणा करून जाणीवपूर्वक हे कृत्य करण्यात आले आहे.व्हायरल पत्रातील माहिती हीपूर्णपणे चुकीची असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते.
मोटार परिवहन (एम.टी) विभागातील आठ हवालदारांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या“बनावट पत्रा” ची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांनी पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीच्याच विभागातीलएका हवालदाराविरोधात संशय व्यक्त केला. पुरावा म्हणून, पोलिसांनी सांगितले की त्यांच्याकडेआणखी दोन पोलिसांचे जबाब आहेत ज्यात हवालदाराने पळून जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्याकार्यालयात पत्र पाठवल्याबद्दल गोपनीय माहिती दिली होती.