करवा चौथवरील टिप्पणी अपमानास्पद; रत्ना पाठक- शाह, पिंकविलाला नोटीस

करवा चौथवरील टिप्पणी अपमानास्पद; रत्ना पाठक- शाह, पिंकविलाला नोटीस

अभिनेत्री आणि नसिरुद्दीन शाह यांच्या पत्नी रत्ना पाठक- शाह यांनी काही दिवसांपूर्वी ‘पिंकविला’ या वेबसाईटला मुलाखत दिली होती. यावेळी आपल्या देशातील महिला आजही जुन्या चालीरीती, प्रथा पाळत आहेत तसेच ‘करवा चौथ’ या व्रताला अंधश्रद्धा असे संबोधून त्यांनी धार्मिक भावना दुखावल्या होत्या. त्यानंतर रत्ना पाठक-शाह आणि पिंकविला यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

मुलाखतीत वादग्रस्त विधानं करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेत्री रत्ना पाठक-शाह यांना, तसेच त्यांची मुलाखत दाखवणार्‍या ‘पिंकविला मिडिया प्रायव्हेट लिमिटेड’, संचालिका नंदिनी शेणॉय, दिग्दर्शक मुकुल कुमार शर्मा आणि ज्यू जॉर्ज यांना नालासोपारा (जिल्हा पालघर) येथील महिला प्रियांका मिश्रा यांनी ३१ जुलै या दिवशी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता प्रतीक साखळकर आणि अधिवक्त्या पूजा जाधव यांच्याद्वारे प्रियांका मिश्रा यांनी ही नोटीस पाठवली आहे.

‘पिंकविला’ यू ट्युब वाहिनीवर रत्ना पाठक यांनी ‘करवा चौथ’ या व्रताला अंधश्रद्धा असे म्हटले होते. देशातील महिलांसाठी अजूनही काहीही बदललेलं नाही आणि देश परंपरावादी बनत चालला आहे. आपल्याला सौदी अरेबियासारखा देश बनवायचा आहे का, असेही रत्ना पाठक म्हणाल्या.

‘स्त्रिया विधवा होण्याच्या भीतीने करवा चौथ व्रत करतात’, हे रत्ना पाठक यांचे वक्तव्य चुकीचे असून कोणत्याही विवाहित स्त्रीने पतीच्या दीर्घायुष्यासाठी ‘करवा चौथ’ व्रत ठेवणे, ही भाग्याची गोष्ट आहे. यातून पती-पत्नी यांच्यातील प्रेम आणि सहवास अनेक जन्म टिकतो. अविवाहित स्त्रियाही चांगला पती मिळावा, यासाठी हे व्रत करतात. हिंदु धर्मातील अत्यंत पवित्र धार्मिक प्रथेवर तुम्ही केलेली टिपणी अत्यंत अपमानास्पद आहे. यातून एकप्रकारे तुम्ही सर्व महिला, तसेच हिंदु धर्मावर श्रद्धा असलेला समस्त हिंदु समाज यांचा अवमान केला आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंग, बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्यपदक

बेस बॉलच्या स्टिकने उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडली

माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत

असा झाला ‘तिरंग्या’चा जन्म !

मुलाखत खळबळजनक करण्यासाठी अशी बेताल विधाने करणे अयोग्य आहे. अन्य धर्मांतील महिलांच्या भेडसावणार्‍या प्रश्नांवर रत्ना पाठक यांनी कधी वक्तव्य केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे ‘केवळ हिंदु धर्मातील पवित्र सणांनाच अशोभनीय ठरवण्याचा हा प्रयत्न आहे का?’, असे वाटते. ज्योतिषशास्त्र, कुंडलिनी, वास्तुदोष यांना तुम्ही अंधश्रद्धा ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. यातून केवळ हिंदूंच्या धार्मिक गोष्टींना लक्ष्य करण्याचा तुमचा हेतू लक्षात येतो. ‘हिजाब’ किंवा ‘ट्रिपल तलाक’ किंवा ‘बुरखा’ या विषयांवर तुम्ही एकही शब्द उच्चारला नाही. ‘करवा चौथ’ व्रत करणार्‍या आधुनिक महिलांना अंधश्रद्धाळू ठरवून तुम्ही स्त्रियांना न्यून लेखण्याचा प्रयत्न केला आहे. या टीकेमुळे व्यथित होऊन सर्व हिंदु महिलांच्या वतीने मी ही नोटीस पाठवत आहे, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version