गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

विवस्त्र छायाचित्रे पाठवण्यास सांगून केले ब्लॅकमेल

गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मिरा भायंदर वसई विरार पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्यावर बुधवारी आचोळे पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील पीडित महिला ही व्यवसायाने वकील आहे. या महिलेच्या तक्रारीवरून पोलीस अधिकारी मल्हारी थोरात या पोलीस अधिकारी यांच्यावर बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मल्हारी थोरात हे पोलीस अधिकारी मिरा भायंदर वसई विरार पोलीस दलाच्या गुन्हे शाखेचे अधिकारी आहे. पीडित महिला ही ३३ वर्षाची असून पोलीस अधिकारी थोरात यांच्याशी तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते. पीडितेने नालासोपारा येथील आचोळे पोलीस ठाण्यात बुधवारी प्रत्यक्ष हजर राहून थोरात यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडितेने तक्रारीत केलेल्या आरोपात असे म्हटले आहे की, थोरात यांनी वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देऊन व पीडितेचे अश्लील छायाचित्रे तिच्या पतीला पाठविण्याची धमकी देऊन मागील तीन वर्षांपासून पीडितेवर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला.

हे ही वाचा:

गणेशोत्सवासाठी दादर गजबजले

आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

सन २०२३मध्ये ९६ टक्के प्रकरणे निकाली निघाली; सर्वोच्च न्यायालयाने दिली माहिती

चंद्रावर पाणी असल्याला पृथ्वीचे वातावरण जबाबदार

तसेच पीडितेला बळजबरीने तिचे विवस्त्र छायाचित्रे थोरात यांनी स्वतःच्या मोबाईल मधील व्हाट्सअप्प वर पाठविण्यास भाग पाडले असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.पीडितेच्या तक्रारीवरून आचोळे पोलिसांनी पोलीस निरीक्षक मल्हारी थोरात याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार), ३७६(२)(एन) (सरकारी अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे), ३७७( अनैसर्गिक बलात्कार), ५०६(२)(धमकी देणे),सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम ६६ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप आरोपी थोरात यांनी अटक करण्यात आलेली नसून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकारी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version